MB NEWS-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिव सेना गणेशपार विभाग यांच्या वतीने, मोफत मास्क व स्यानेटाईजर वितरण.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिव सेना गणेशपार विभाग यांच्या वतीने, मोफत मास्क व स्यानेटाईजर वितरण



 परळी वै :-

                  शिव सेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त, व त्यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्यांवर जे नैसर्गिक संकट उभे राहिले आहे.त्यामुळे स्वतःचा वाढदिवस झगमगीत न करता सरळसाध्य पध्दतीने साजरा करावा अशी भूमिका घेतली असल्याने,माजी शिवसेना उपशहर प्रमुख सचिन स्वामी, यांच्या संकल्पनेतून,गाव भागातील जागृत देवस्थान असलेल्या गणपती मंदिर येथेंअंगारकी चतुर्थी निमित्ताने गणेश पूजन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभावे,राज्यावरील नैसर्गिक आपत्ती दूर व्हावी म्हणून पार्थना करण्यात आली.



      व त्याच अनुषंगाने सेनेचे तत्व म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण, या पद्धतीनूसार,आज शिव सेनेचा गढ असलेल्या गणेशपार भागात, हातगाडी विक्रेते, गणपती भक्त गण,परिसरातील दुकानदार, यांना मोफत मास्क व स्यानेटाइजर वाटप करण्यात आले.

      या प्रसंगी  या कार्यक्रमाचे , जेष्ठ शिवसैनिक नंदकुमार रामदासी, व्यंकूमामा सुरवसे, माजी उपशहर प्रमुख बालासाहेब देशमुख, संजय गावडे,रमेश लोखंडे, पांडुरंग जाधव,गणेश सारस्वत, वैजनाथ देशमुख,सुदाम राऊत,हरी लोखंडे,साखरे,राम जुगधर,हनुमान भंडारी,विरकूमार स्वामी यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !