MB NEWS-धर्मापुरी फाट्यावर आसर्याला राहत मिळेल ते खाऊन जीवन कंठणार्या महिलेचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलीसांचे आवाहन

 कुणीच नाही माझे..... तळहात पोरके ..ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ......... !




🌑 धर्मापुरी फाट्यावर आसर्याला राहत मिळेल ते खाऊन  जीवन कंठणार्या महिलेचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलीसांचे आवाहन

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       गेल्या अनेक दिवसांपासून धर्मापुरी फाट्याच्या परिसरात फिरणार्या मानसिक समस्याग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे.ती कोण,कुठली,नाव काय, नातेवाईक कोण याचा काहीच पत्ता नाही.धर्मापुरी फाट्याच्या परिसरातील व्यापारी बांधव व नागरीक तिला खायला द्यायचे ,तिथेच कुठेही आसर्याला ती थांबायची. या अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी आवाहन केले आहे.

       याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,गेल्या अनेक दिवसांपासून धर्मापुरी फाट्याच्या परिसरात फिरणार्या मानसिक समस्याग्रस्त महिलेचा मृत्यू दि.४ रोजी झोपलेल्या अवस्थेत झाला. अंदाजे ३० वर्षे वय, रंग निमगोरा,चेहरा लांबट, उंची ५फुट, बांधा सडपातळ, फिक्कट काळ्या रंगाचा अंगावर पेटीकोट असे या मयत महिलेचे वर्णन आहे.या महिलेची ओळख पटविण्यासाठी कोणास माहिती असेल तर संभाजी नगर पोलीस ठाण्यात किंवा पो.ह.आर.एस.पवार मो.क्र.९८२२५५५८४३ यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !