MB NEWS-परळीकरांची वचनपूर्ती : परळी शहर बायपास व परळी ते धर्मापुरी रस्त्याचे शनिवारी ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन*

 *परळीकरांची वचनपूर्ती : परळी शहर बायपास व परळी ते धर्मापुरी रस्त्याचे शनिवारी ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन*



परळी (दि. 02) ---- : परळी शहर बायपास व परळी ते धर्मापुरी या दोन रस्त्यांच्या कामाला सुरुवात होत असून उद्या शनिवारी (दि. 03) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या दोनही कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. 


अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या परळी बायपासचे मागील सरकारच्या काळात अनेकवेळा भूमिपूजन झाले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या दोनही कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून या दोनही कामांना प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. 


ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहर बायपासचे अंबाजोगाई रोडवरील बायपास जंक्शन येथे दुपारी दोन वाजता तसेच परळी ते धर्मापुरी रस्त्याचे गंगाखेड रोड जंक्शन येथे दुपारी 2.30 वा. भूमिपूजन संपन्न होणार असून या कार्यक्रमास जि. प.अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, आ. संजय भाऊ दौंड, परळीच्या नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हलगे आदीसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


 कोविडविषयक निर्बंधांमुळे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. 


मे. यश कन्स्ट्रक्शन या कंपनीला या दोन्ही रस्त्यांचे काम मंजूर झाले असून त्यांच्यामार्फत उद्या भूमिपूजन होताच तातडीने काम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. 


 परळी बायपास या चार किलोमीटर लांबीच्या चार पदरी डांबरी रस्त्याचे काम एका वर्षात  तर परळी धर्मापुरी  या साडे बावीस किलोमीटर रस्त्याचे   डांबरीकरणाचे काम 9 महिन्यात पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


*परळीकरांची वचनपूर्ती*


विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या वचननाम्यात परळी बायपास,  परळी - अंबाजोगाई तसेच परळी -धर्मापुरी, परळी- गंगाखेड या रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते . त्यानुसार अवघ्या दीड वर्षात परळी अंबाजोगाई या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून परळी बायपास व परळी धर्मापुरी चा कामाला उद्या शुभारंभ होत आहे . 


याशिवाय धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळेच मंजूर झालेल्या परळी ते संगम या रस्त्याचे कामही सध्या प्रगतीपथावर असून परळी गंगाखेड या रस्त्याच्या निविदेचे काम अंतीम टप्प्यात आहे. या कामांनाही लवकरच सुरुवात होणार आहे मतदार संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे  दळणवळणाचे प्रश्न मार्गी लागत असल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार