MB NEWS-वैद्यनाथ साखर कारखाना भविष्यनिर्वाह निधी थकबाकी प्रकरण: कोणतेही बॅक खाते जप्त झाले नसल्याचे कारखान्याचे स्पष्टीकरण

 वैद्यनाथ साखर कारखाना भविष्यनिर्वाह निधी थकबाकी प्रकरण: कोणतेही बॅक खाते जप्त झाले नसल्याचे कारखान्याचे स्पष्टीकरण


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी थकबाकी प्रकरणी थकीत रक्कम वसुली करण्याच्या संदर्भाने ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने बँक खाते सील केले असल्याची माहिती आहे.मात्र वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे कारखान्याने स्पष्टिकरण दिले आहे.

        पीएफची रक्कम थकल्यामुळे ईपीएफओच्यावतीने  कारवाई करण्यात आली आहे. पीएफचे एक कोटी 46 लाख रुपये थकलेले होते. ईपीएफओच्यावतीने 92 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.शिल्लक थकबाकी घ्या वसुलीसाठी कारखान्याचे खाते सील(होल्ड) करण्यात आले. थकबाकी वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले आहे.

         दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जी पी एस दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारच्या बातम्या देणं आणि शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात आणणं  हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही असे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार