MB NEWS-गेवराईच्या बालग्राममधील चिमुकल्यांनी साजरा केला पंकजाताई मुंडेंचा वाढदिवस* *मुलांच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करु ; पंकजाताईंची ग्वाही*

 *गेवराईच्या बालग्राममधील चिमुकल्यांनी साजरा केला पंकजाताई मुंडेंचा वाढदिवस*



*मुलांच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करु ; पंकजाताईंची ग्वाही*


गेवराई । दिनांक २९ ।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस खरे तर २६ जुलैचा,परंतु सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळा, समर्पण, सेवाभाव आणि दातृत्वगुणांमुळे आजही कार्यकर्त्यांद्वारा त्यांचा वाढदिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे विविध उपक्रम राबवून साजरा केला जातो.अगदी लहान थोरांपासून सर्वांनीच पंकजाताईंना वाढदिवसानिमित्त आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या,परंतु गेवराईच्या बालग्राममधील चिमुकल्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि साजरा केलेला वाढदिवस काही वेगळाच आणि संस्मरणीय असाच होता.


 पंकजाताई मुंडे यांनी औरंगाबादहुन बीडकडे जाताना गेवराई येथे संतोष गर्जे यांच्या बालग्रामला भेट दिली.याठिकाणी चिमुकल्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले तसेच केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी चिमुकल्यांचा उत्साह पाहून त्या भारावून गेल्या.त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत पंकजाताईंनी त्यांची विचारपूस केली.बालग्राममधील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करू,गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान त्यासाठी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.तसेच बालग्राममधील मुलांच्या सोयीसुविधांची पाहणी करून मुलांसमवेत जेवणही घेतले. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार