MB NEWS-मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही ; पंकजाताई मुंडेंनी मुंबईत कार्यकर्त्यांशी साधला संवाद* *माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले, तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू ?*

 *मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही ; पंकजाताई मुंडेंनी मुंबईत कार्यकर्त्यांशी साधला संवाद* 



*माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले, तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू ?*


मुंबई । दिनांक १३।

मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्याचे राजीनामे नामंजूर केले. माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले, तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू, असंही त्या यावेळी म्हणाल्या.




पंकजाताई मुंडे यांच्या भेटीसाठी आज वरळी येथील कार्यालयात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी त्यांचेशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यावेळी उपस्थित होत्या.


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रीतमताई मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून राजीनामा सत्र सुरू केले होते, त्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी दिल्लीहून परत आल्यानंतर आज सर्व कार्यकर्त्यांची भेट घेतली. 



यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही. मला दबावतंत्र करायचं नाही. मी काल दिल्लीला गेले होते. संघटनेच्या कामासाठी गेले होते. अत्यंत सन्मानाची वागणूक पंतप्रधान मोदी, अध्यक्ष नड्डा यांच्याकडून मिळाली. कार्यकर्त्यांची नाराजी आपण दूर कराल असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला होता. मोठा नेता नेहमीच त्याग करतो असंही त्या म्हणाल्या. जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार असल्याचंही पंकजाताई मुंडे म्हणाल्या. 


*वंचितांची सेवा करण्यासाठी राजकारणात* 

------------------

मी कुणालाही घाबरत नाही, निर्भिड राजकारणाचे संस्कार माझ्यावर आहेत, असं त्या म्हणाल्या. मी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं कारण मला वंचितांची सेवा करायला मिळायला हवी. गोपीनाथ मुंडेंनी तळागाळातील लोकांसाठी काम केलं. मला राजकारणात आणताना त्यांनी मोठा विचार मनात घेऊन आणलं. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी आम्हाला राजकारणात आणलं नाही. कोणतंही पद मिळवण्यासाठी मी राजकारणात आले नाही.  हे आपले संस्कार नाहीत. लोकांची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले. माझा परिवार सर्व कार्यकर्त्यांचा परिवार आहे. मी कार्यकर्त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही, असं त्या म्हणाल्या.

डाॅ.भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी माझ्या समाजाच्या मंत्र्यांला अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, असं त्या म्हणाल्या. 


*मोदी, शहा, नड्डा माझे नेते*

-------------------------

केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या. आम्ही कुणाला घाबरत नाही. मी कुणाचा अनादर करत नाही.माझा नेता नरेंद्र मोदी, अमित शहा व नड्डा जी आहेत असं पंकजाताई यावेळी म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !