MB NEWS-वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन अशोक जैन यांचा राजीनामा

 अॅक्शन मोड: पंकजा मुंडे परळीत; घडामोडींना वेग

वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन अशोक जैन यांचा राजीनामा

परळी वैजनाथ  : प्रतिनिधी

     भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील व मराठवाड्यात बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक असलेल्या वैद्यनाथ अर्बन को.आॅप.बॅकेचे चेअरमन अशोक जैन यांचा राजीनामा दिला आहे.या बॅंकेच्या येत्या काही महिन्यांत निवडणुका आहेत.ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देण्यात आल्याने अनेक राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत. येणार्या निवडणुका लक्षात घेता पंकजा मुंडे चेअरमनपदी कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

         संपूर्ण राज्यात शाखा असलेल्या वैद्यनाथ अर्बन को आॅप.  बँकेचे अध्यक्ष अशोक जैन  यांनी गुरुवारी (दि.२९) सायंकाळी झालेल्या बोर्ड कमिटीच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा आपण वैयक्तिक कारणांमुळे देत असल्याचे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य असलेली व १००० कोटींच्या ठेवी असलेल्या वैद्यनाथ  बँकेचे गेल्या १० वर्षांपासून अशोक जैन हे अध्यक्ष राहिलेले आहेत. दिला. १३ जुलै २०११ ला अशोक जैन यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर २५० कोटींच्या ठेवीवरुन १००० कोटींच्या ठेवी, मराठवाड्यानंतर  संपूर्ण महाराष्ट्रात बँकेच्या शाखा स्थापन करुन विस्तार केला. अशोक जैन यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून गैरव्यवहाराचे आरोप होऊ लागले. पण या सर्व आरोपांना अशोक जैन यांनी बँकेच्या प्रगतीतून या आरोपांना उत्तर दिले आहे. पण गुरुवारी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे कारण देत अशोक जैन यांनी राजीनामा दिला. आता या बँकेचे अध्यक्ष म्हणून पंकजा मुंडे कोणाची नेमणूक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  येत्या काही महिन्यात बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूका होणार आहेत.यादृष्टीने नवीन चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार याला विशेष महत्त्व आहे.

टिप्पण्या

  1. बदल अपेक्षितच आहे कारण पुढील काळामध्ये नवीन नेतृत्वाला किंवा हुशार अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळेल

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार