MB NEWS-एकेक सहकारी रत्नाची खाण - प्रत्येकाच्या खस्तांची मला जाण असं सांगत धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना दिले भान ! ⬛तुम्ही सर्व माझा परिवार:जन्मदिनी भावुक होत केलं मन मोकळं

 एकेक सहकारी रत्नाची खाण - प्रत्येकाच्या खस्तांची मला जाण असं सांगत धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना दिले भान !


⬛तुम्ही सर्व माझा परिवार: जन्मदिनी भावुक होत केलं मन मोकळं !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

         लाखो समर्थकांना एकाचवेळी 'अपिल' होणारा संदेश व संकेत देणं ही शैली धनंजय मुंडे यांच्याकडे आहे.धनंजय मुंडे म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वाचा अनोखा संगम आहे हे वेळोवेळी दिसुन येते.कालच्या जन्मदिन मनोगतातून बोलताना माझा एकेक सहकारी रत्नाची खाण असल्याचे सांगून प्रत्येकाच्या खस्तांची मला जाण आहे असं सांगत धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना राजकीय वाटचालीत संघर्ष, प्रामाणिकपणे काम करणे, दिखाऊपणा न करणे, संयम ठेवणे, अंतर्गत कुरबुर्या, मतभेद वाढु न देता पुढे जायचे असते याचे मार्गदर्शन करीत एकप्रकारे भान दिले.

         धनंजय मुंडे म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वाचा अनोखा संगम आहे हे वेळोवेळी दिसुन येते. त्यांच्या एकाएका वाक्याचा परिणाम समर्थकांवर होतो.तसच त्यांच्या राजकीय रणनितीचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीची व्याप्ती खुप मोठी आहे.हजारो प्रमुख कार्यकर्ते आणि लाखो समर्थकांना एकाचवेळी 'अपिल' होणारा संदेश व संकेत देणं ही शैली धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. काल दि.१५ रोजी जन्मदिनाच्या मनोगतातून हे पुन्हा एकदा दिसून आले. त्यांचा संपूर्ण राजकीय संघर्ष माहिती असणारे जवळपास सर्वच प्रमुख कार्यकर्ते, सहकारी,परिवार यावेळी समोर होते व प्रसंग जन्मदिनाचा होता.त्यामुळे हे नेहमीचे राजकीय व्यासपीठावरील भाषण नव्हते तर हा आपल्याच परिवारातील सदस्यांशी मुक्त संवाद होता.राजकारणात आजपर्यंत प्रामाणिक पणे काम केल्यामुळे जनतेने डोक्यावर घेतले राजकारणात कधीही दिखाऊपणा केला नाही, इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणूक जिंकणार असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

        मी राजकारणात करत गेलो, अनेक सहकारी सोबत आले ,मला नेता म्हणायला लागले, आमचा राजकारणात प्रामाणिकपणा आहे, म्हणून लोकांनी डोक्यावर घेतले, दिखावापणा करु नका, असा संदेश कार्यर्त्यांना बोलताना दिला.अनेक निवडणूका लढलो, पडलो पण भविष्यात प्रत्येक निवडणूक जिंकणार आहे. समाजकारणात राजकारण केले नाही, समाजकारणच केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक झाला, राजे सिंहासनावर बसत असताना प्रत्येक पायरीवर एक अश्रू पडत होता, ते अश्रू स्वराज्यासाठी खस्ता खाललेल्यासांठी होते, इथेही मला माहिती आहे, मला इथपर्यंत पाठवण्यासाठी अनेकांनी खस्ता खालल्या आहेत. याची जाणीव आहे. ज्या काळात लोक शिव्या देत होते त्यावेळी शरद पवार, अजित पवार यांनी मला विरोधीपक्षनेते पद दिले, हे कधी विसरणार नाही असे सांगत त्यांनी कृतज्ञभाव व्यक्त केला.

        जीवनात अनेक चढ-उतार पाहिले.निवडणुका हरलो-जिंकलो. पण प्रत्येक वेळी प्रामाणिकपणे काम करत राहिलो.कधीही दिखाऊपणा केला नाही.एक एक सहकारी जोडत गेलो.एकवेळ होती मी तर सोडाच पण माझ्या आसपास फिरकणार्या, माझ्यासमवेत फिरणार्या प्रत्येकाला त्रास सहन करावा लागला. आज लोकं मला नेता म्हणू लागले व माझ्यासोबतचे सहकारीही नेते होऊन विविध पदांवर यशस्वी काम करीत आहेत.हे सोपं काम नाही तर ऐतिहासिक काम आहे याचा मला निश्चितच अभिमान आहे.असाचआशिर्वाद कायम ठेवा.उतणार नाही,मातणार नाही , घेतलेला जनसेवेचा वसा सोडणार नाही असे जन्मदिन मनोगत व्यक्त करतानाच यापुढची प्रत्येक निवडक जिंकणारच असा आत्मविश्वासपुर्वक दृढ संकल्प ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार