परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
अतिक्रमण धारकांवर कारवाई करा मागणीसाठी पंचायत समिती समोर आमरण उपोषण
परळी (प्रतिनिधी)....
परळी पंचायत समिती कार्यालयासमोर त्रस्त आमले कुटुंब अतिक्रमण धारकांच्या विरोधात दि १६ रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे.
देवराव नारायण आमले यांच्या मालकीच्या जागेत ज्याचा नमुना न ८-अ चा उतारा असून देखील अतिक्रमण करून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे बांधकाम करून शासनाचा निधी लाटला आहे. याद्वारे संबंधित व्यक्तीने शासनाची व देवराव आम्ले यांची फसवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. या पूर्वी देवराव आमले यांनी त्यांची रीतसर तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशन परळी या ठिकाणी दि २८-०३-२०२१ रोजी दिलेली आहे. तसेच पंचायत समिती कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती प्राप्त करून सत्य उजेडात आणले आहे.
या उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनास जागे करण्यासाठी व न्याय हक्क प्राप्त करून घेण्यासाठी अतिक्रमण धारकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. चुकीचा व सदोष अहवाल तयार करून देऊन तोंडाला पाने पुसन्याचे काम केले गेले आहे. ते त्वरित थांबवावे व प्रकरण निकाली काढावे अशी मागणी किसानबाई नारायण आमले, विजयमला आमले, पद्मीणबाई आमले, संगीता आमले, उषा जाधव, मयूर जाधव, सोमेश्वर जाधव आदी उपोषणकर्ते व कुटुंबीयांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा