परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
परळी-गंगाखेड रस्त्यावर खदाणीजळ एकाचा मृतदेह आढळला
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
परळी-गंगाखेड रस्त्यावर खदाणीजळ एकाचा मृतदेह आढळला आहे.मयत इसम एका झाडाखाली झोपला व यातच त्याचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,परळी-गंगाखेड रस्त्यावर खदाणीजळ दुपारच्या सुमारास येऊन एका झाडाखाली झोपला होता.बराच वेळ गेल्यानंतर ही व्यक्ती मृत झाल्याचे निदर्शनास आले.ग्रामीण पोलीसांना ही माहिती मिळताच स्वतः प्र.पो.नि.मुंडे घटनास्थळी दाखल झाले. मयत इसमाचे नाव बालाजी महादेव कसबे (वय ४० वर्षे) रा.साठेनगर परळी वैजनाथ असे आहे.उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा