MB NEWS-बहुभाषिक भाऊबाबा वंजारी संघाच्या मराठवाडा कायदेविषयक सल्लागार पदी अॅड.दत्तात्रय आंधळे

 बहुभाषिक भाऊबाबा वंजारी संघाच्या मराठवाडा कायदेविषयक सल्लागार पदी अॅड.दत्तात्रय आंधळे



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

  येथील सर्वपरिचित विधिज्ञ दत्तात्रय आंधळे यांची बहुभाषिक भाऊबाबा वंजारी संघाच्या मराठवाडा कायदेविषयक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    बहुभाषिक भाऊबाबा वंजारी संघाच्या मराठवाडा कार्यकारिणीत कायदेविषयक सल्लागार पदी अॅड.दत्तात्रय आंधळे यांची संघाच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.लक्ष्मी गरकळ यांनी नियुक्ती केली.नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

     ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराजआंधळे हे परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत.ए.एल .एल.बी चे उच्चशिक्षित असुन परळीवैजनाथ जि.बीड न्यायालयात वकिली करतात.महाराष्ट्रभर वारकरी पध्दतीने कीर्तनाचे माध्यमातून प्रचार व प्रसार करतात.भागवत कथाकार,संतवाङ्मयाचे संशोधक म्हणून ते परिचित आहेत.त्यांची ज्ञनदेवांची गुरुगीता,ज्ञानेश्वरी अनुभवावी ही कथा,श्री संत जगमित्र नागा चरित्र,आद्यकवी श्रीमुकुंदराज एक शोध -वाट,जाणिवेच्या कळा, आदी ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.विशेष बाब म्हणजे मराठी भाषा विकिपीडियावर त्यांची दोन पुस्तके अगदी सुरुवातीला मराठी साहित्य आद्य संत कवी या सदरामध्ये मुकुंदराज आणि श्री संत जगमित्र नागा या दोघा वर त्यांची नोंद आहे.आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार घटनेत दुरुस्ती करून देण्यात आला.आंतरराष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले .वृत्तपत्रातून सातत्याने लिखाण करतात. सर्व सामाजिक आणि धार्मिक चळवळीचे केंद्र म्हणून पाहिल्या जाते.वारकरी साहित्य परिषद मराठवाड्याचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत.वारकरी महामंडळ कायदेशीर सल्लागार मराठवाडा विभाग म्हणून ते काम करतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !