परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस दादहारी वडगांव गटात सामाजिक उपक्रम राबवुन साजरा मुलींच्या हस्ते केक कापून अभिष्टचिंतन लोककल्याणासाठी ताईंना शतायुष लाभो-राजेश गिते.

 पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस दादहारी वडगांव गटात सामाजिक उपक्रम राबवुन साजरा


मुलींच्या हस्ते केक कापून अभिष्टचिंतन



लोककल्याणासाठी ताईंना शतायुष लाभो-राजेश गिते

आज दि २६/०७/२०२१रोजी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दादाहारी वडगांव जिल्हा परिषद गटात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

दादाहारी वडगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात निराधारांना ब्लॅंकेट वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,कोरोना योध्दांचा सन्मान, महिलांना साडी चोळी भेट, वृक्षारोपण करून पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला


या कार्यक्रमात कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस कुलकर्णी ताई, चौधरी ताई,सुरवसे ताई यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साडी चोळी भेट देऊन गौरविण्यात आले.कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विष्णु गिते (तलाठी), हजारे साहेब (ग्राम सेवक),गव्हाणे सर (मुख्याध्यापक) गोविंद गुट्टे (आरोग्य दुत),सावता गायकवाड (ओपरेटर)यांचा कोरोना योध्दा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.गावातील निराधार वृध्दांना मान्यवरांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

याच कार्यक्रमात मुलींच्या हस्ते केक कापून ताई साहेब यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दादाहारी वडगांव चे सरपंच बजरंग (दादा)कुकर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे संयोजक राजेश गिते,(भाजपा नेते)भरत सोनवणे, (प स सदस्य)मारोतराव फड, मा प स सदस्य) मांडवासरपंच सुंदर मुंडे, नंदनंज सरपंचअनिल गुट्टे, बेलंबा सरपंच किशोर गिते, मिरवट सरपंच धुराजी साबळे, नंदनंज उपसरपंच हनुमंत गुट्टे, कासारवाडी मा सरपंच दशरथ (दादा) गुट्टे, कौठळी मा सरपंच भिमराव हाके,लोणी मा सरपंच प्रल्हाद शिंदे, मिरवट चेअरमन भरतराव इंगळे, युवा नेते पप्पु चव्हाण, संतोष राठोड, भास्कर गिते, उध्दव महाराज शिंदे, माणिकराव मुंडे, सुदर्शन मुंडे, प्रमुख अतिथी म्हणून  उपस्थित होते.

या कार्यक्रमास नाथराव गुट्टे, माणिक गुट्टे, बालाजी गुट्टे, महादेव गुट्टे, विनायक गुट्टे, संदिप गुट्टे,माणाजी गुट्टे, बालाजी गिते, गणेश लांडगे, प्रदिप गिते, शिवाजी भाटकर, गोपाळ गिते, वैभव गिते, राहुल भाटकर,राजेभाऊ भांगे, नारायण डोंगरे, बाबुराव गर्जे,रूस्तुम मोठे, भानुदास मुंडे,गणपत पवार, हनुमान मुंडे,सोनेराव मुंडे, बिभीषण शिंदे,बाबु मुंडे, भास्कर मुंडे,मिठ्ठु फड, सुनिल कुकर,गोरख काटे, धनंजय कुकर,जनार्धन मुंडे, कपिल मुंडे,राम मुंडे, भजन मुंडे, सुभाष मुंडे आदि व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

.कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना राजेश गिते यांनी कार्यक्रम ठेवण्या मागे पंकजाताई मुंडे यांनी जो समाजसेवेचा वसा हाती घेतला आहे त्यात आपला सुध्दा खारिचा वाटा असावा म्हणून ताईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले

.पंजाताई मुंडे चालवत असलेली लोककल्याण चळवळ अशीच अहोरात्र चालत राहो आणि यासाठी पंकजाताई यांना शतायुषी लाभो अशी प्रार्थना मी प्रभु वैद्यनाथ चरणी अणि दत्त गुरु चरणी करतो अशी भावना राजेश गिते यांनी व्यक्त केली

.पंचयत समिती सदस्य भरत सोनवणे आणि नंदनंज सरपंच हनुमंत गुट्टे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले

.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन प्रा अजय गिते यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!