MB NEWS- *नात्याला काळीमा : धमकी देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल* ⬛ *गुंगीचे औषध देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार*

 *नात्याला काळीमा : धमकी देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल*



 ⬛ *गुंगीचे औषध देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार*

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

         धमकी देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय पिडीत विवाहितेच्या फिर्यादी वरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सुरुवातीला गुंगीचे औषध देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले व नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याचा नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार समोर आला आहे.

         याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पिडित महिला व आरोपी हे नात्याने मेव्हणा-मेव्हणी आहेत.दोन वर्षांपूर्वी आरोपी फिर्यादी पिडित महिला घरी एकटी असताना आला.फ्रुट ज्युसमध्ये गुंगीचे औषध देऊन या महिलेला बेशुद्ध केले. विवस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्याचा व्हिडिओ व छायाचित्रे काढली.त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक अत्याचार केले. अशा आशयाची फिर्याद दिल्यावरुन आरोपी राहुल सुधाकर गुत्तेदार रा.सोन्वत ता.कमलापुर जि.गुलबर्गा (कर्नाटक) याच्याविरुद्ध कलम ३७६(२) एन,३७६ का(अ),३६६,५०४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि मेंढके हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार