MB NEWS-एमआयडीसी मध्ये लवकरच नवीन उद्योग आणणार ; थर्मल पवार प्लांटमध्ये सोलारचे प्लांट सुरू करू -ना.धनंजय मुंडे

 *एमआयडीसी मध्ये लवकरच नवीन उद्योग आणणार ; थर्मल पवार प्लांटमध्ये सोलारचे प्लांट सुरू करू -ना.धनंजय मुंडे



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

           अनेक वर्षांपासून पाहिलेले पंचतारांकित एमआयडीसीचे काम आम्ही सत्तेत येतात पूर्णत्वाकडे घेऊन जात आहोत, नोटिफिकेशन निघाले, 35 हेक्टर जागेची प्रत्यक्ष मोजणी पूर्ण झाली, आता या जागेत नवनवीन गुंतवणूकदार आणून इथे उद्योगांना चालना देऊ, या भागात नवीन रोजगार निर्मिती करू; यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे ना. धनंजय मुंडे  म्हणाले. थर्मल पवार प्लांट मधील काही संच कोळसा व अन्य अडचणींमुळे बंद करण्यात आले आहेत, मात्र आपण ऊर्जा विभागाशी याबाबत चर्चा केली असून, तितक्याच क्षमतेचे सोलार प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही ना. मुंडे म्हणाले. 

               परळी मतदारसंघातील रखडलेल्या प्रत्येक विकासकामांना येत्या काळात गती देऊन दिलेला पूर्ण शब्द करू, परळी शहर व तालुका समृद्ध करून इथल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीचे उत्त्पन्न वाढविणे हे आपले उद्दिष्ट आहे व त्यापासून मी कधीही स्वतःला वेगळे करू शकत नाही, असे म्हणतच परळीचा लातूर व नांदेड शहरांच्या धर्तीवर विकास करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ना. धनंजय मुंडे  यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार