परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून त्यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावेत : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे*

 *सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून त्यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावेत   : सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे* 



मुंबई,दि.1: सामाजिक न्याय विभागाने सफाई कर्मचा-यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून सफाई कर्मचा-यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, हाताने मैला उचलणा-या मृत सफाई कामगारांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार ३२ मृत सफाई कर्मचा-यांपैकी फक्त ११ जणांनाच लाभ मिळाला आहे तरी उर्वरीत २१ प्रकरणे ज्या ज्या पातळीवर प्रलंबित आहेत त्यावरती विभागांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिले.



            हाताने मैला उचलणा-या मृत सफाई कर्मचा-यांच्या कुटूंबियाना नुकसान भरपाई मिळण्याबाबत सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे  यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे,समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे,सहसचिव दिनेश डिंगळे, नगरविकास,कामगार विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.


 सन २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषद सदस्य भाई गिरकर यांनी या विषयासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.त्यामध्ये हाताने मैला उचलणा-या मृत सफाई कर्मचा-यांच्या हितासंदर्भात केंद्र शासनाने केलेल्या कायद्याप्रमाणे राज्यात कार्यवाही  करावी असे सुचित केले होते. 


केंद्र शासनाने हाताने मैला उचलणा-या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम 2013 असून हा कायदा 6 डिसेंबर 2013 पासून देशात लागू आहे. या कायद्यातंर्गत दूषीत गटारांमध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या हाताने मैला उचलणा-या कामगारांच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार 32  पैकी फक्त 11 जणांना याचा लाभ मिळाला आहे तरी उर्वरीत २१ प्रकरणे ज्या ज्या पातळीवर प्रलंबित आहेत त्यावरती विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी,असे निर्देश सूचनाही मंत्री श्री.मुंडे यांनी दिले.


  सफाई कामगारांच्या घरांचा २१ वर्षाचा अनुशेष भरून  काढणे, सफाई कामगारांचे वारसा हक्क कायदे,सफाई कामांमधील ठेकेदारी पध्दती रद्द करणे, याबाबत नगरविकास विभागाने आतापर्यंत काय कार्यवाही केली आहे, याची माहिती आठ दिवसात सामाजिक न्याय विभागाला सादर करावी.घनकच-याशी संबधित सर्व कामगारांना सफाई कामगार हे पदनाम देवून लाड पागे समितीच्या  शिफारशींची अमंलबजावणी करावी असे निर्देश मंत्री श्री.मुंडे यांनी दिले.              


                 ******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!