MB NEWS-दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश; विद्यार्थ्यांचा हिरमोड

 दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश; विद्यार्थ्यांचा हिरमोड

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      दहावीचा आज निकाल जाहीर करण्यात आला असून तो दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार असल्याचे बोर्डाने जाहीर केले पण वेबसाईटला काही तांत्रिक अडचण आल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी आल्या. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, अनेक तास उलटून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आलेला नाही. दहावीचा निकाल पाहण्यासाठी दिलेल्या तीनही वेबसाईट अनेक तास उलटूनही अद्याप देखील डाऊनच आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. वेबसाईट डाऊन का झाल्या याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

          दरम्यान हा शिक्षण मंडळाच्या गलथान कारभाराचा नमुना आहे.याची सखोल चौकशी प्रा. प्रविण  फुटके यांनी केली.तर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचा सगळीकडूनच खेळखंडोबा सुरू आहे.दहावीचा निकाल पाहण्यासाठी दिलेल्या तीनही वेबसाईट अनेक तास उलटूनही अद्याप देखील डाऊनच आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे.दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पालक महादेव शिंदे यांनी केली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार