MB NEWS-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परळी शाखेच्या वतीने "परिषद की पाठशाला" उपक्रम सुरू

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परळी शाखेच्या वतीने "परिषद की पाठशाला" उपक्रम सुरू



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परळी शाखेच्या वतीने "परिषद की पाठशाला" हा उपक्रम राबविण्यात येत आहे.याअंतर्गत ऑनलाईन शिक्षणापासुन वंचित राहत असलेल्या आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांची शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

              मागील दिड वर्षा पासून संपुर्ण शाळा बंद असल्याने लहान मुलांना जे शिक्षण शाळेत मिळायचे ते बंद झाले. जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेवू शकत होते त्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले परंतु ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती त्यांची मात्र अडचण झाली.



अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परळी शाखेच्या वतीने "परिषद की पाठशाला" हा उपक्रम शहरमंत्री वाघेश्वर मोती यांनी जिल्हा प्रमुख डॉ. एल. एस. मुंडे,शहरअध्यक्ष प्रा. समिर रेणुकदास,उपाध्यक्ष प्रा. टी. ए. गित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर विद्यार्थ्यांना  सोबत घेत अशा विद्यार्थांच्या मदतीने शालेय एकत्रित करत विद्यार्थांना शालेय अभ्यासक्रम, व्यवहारीक प्रशिक्षण, कौशल्य विकास,महापुरुषांची माहिती तसेच नवीन तंत्रज्ञान मोफत शिकवणार आहेत. या उपक्रमाची सुरूवात आज समता नगर येथे वाघेश्वर मोती यांनी विद्यार्थांना सोशल डिस्टंसिंग ठेवत , प्रत्येक विद्यार्थांला मास्क वापरायला लावून व हात सॅनिटाईज करुन सुरुवात  केली. यापुढे असा उपक्रम परळी मध्ये कृष्ण नगर, गणेशपार, विद्यानगर,  कौठळी, कण्हेरवाडी, तळेगाव, थर्मल कॉलणी, सुभाष चौक इत्यादी ठिकाणी ८ जुलै पर्यंत होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार