MB NEWS-आरोग्य सेवा सप्ताह: रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीराचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ !* 🕳️ _रक्तदाब व मधुमेहींसाठी उपयुक्त ; अधिकाधिक लाभ घ्या- डॉ.संतोष मुंडे_

 *आरोग्य सेवा सप्ताह: रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीराचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ !*


 _रक्तदाब व मधुमेहींसाठी उपयुक्त ; अधिकाधिक लाभ घ्या- डॉ.संतोष मुंडे_

    

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान राष्ट्रवादी  काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य आरोग्य सेवा सप्ताहात आयोजित रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीराचा शेकडो नागरिकांनी  लाभ घेतला.रक्तदाब व मधुमेहींसाठी उपयुक्त ठरणारे हे शिबिर असुन अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.संतोष मुंडे यांनी केले.

                 शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी धनंजय मुंडे आरोग्य मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात विविध 100 भागात संपन्न होणाऱ्या मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीराचा शुभारंभ  करण्यात आला.ना.धनंजय मुंडे आरोग्यमित्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात विविध 100 ठिकाणी संपन्न होणाऱ्या मोफत रक्तदाब(बी पी) व मधुमेह (शुगर) तपासणी शिबिराचे उद्घाटन लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे नटराज रंग मंदिर येथे संपन्न झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, जाबेर खान पठाण,सुरेश टाक,अय्युब भाई पठाण,डॉ.संतोष मुंडे,अझीज कच्छी,वैजनाथ बागवाले,वैजनाथ सोळले,अनंत इंगळे,अनिल आष्टेकर, नितीन कुलकर्णी,गोविंद कुकर,डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, श्रीकांत मांडे,शंकर कापसे,डॉ. आनंद टिंबे,रमेश चौंडे,के.डी. उपाडे, रवी मुळे,लालाखान पठाण, प्रा.शामसुंदर दासूद, सुभाष वाघमारे,शेख मुख्तार, सयद अली,अमर रोडे,शशीकांत बिराजदार, जितेंद्र नव्हाडे, बळीराम नागरगोजे,पवन फुटके,रमेश मस्के,विष्णू साखरे, भागवत गित्ते,शरद कावरे,प्रदीप जाधवर,राज जगतकर,प्रताप धर्माधिकारी, रत्नाकर कुलकर्णी, अभिजित धाकपाडे, नरसिंग गायकवाड, राजाभाऊ स्वामी, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.अनेक गरजू रुग्णानी आज शिबीरात लाभ घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !