MB NEWS- *परळी-अदिलाबाद डेमु पॅसेंजर रेल्वे परळीत दाखल;प्रवाशांनी केले स्वागत*

 *परळी-अदिलाबाद डेमु पॅसेंजर रेल्वे परळीत दाखल;प्रवाशांनी केले स्वागत*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे सेवा आता हळुहळु सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये परळी मार्गावरील महत्त्वाची परळी-अदिलाबाद पॅसेंजर सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेचे आज दि.२१ रोजी प्रथमच आगमन झाले.परळी-अदिलाबाद डेमु पॅसेंजर रेल्वे परळीत दाखल झाल्यानंतर प्रवाशांनी  स्वागत केले.



        परळी वैजनाथ आदिलाबाद या डेमु स्पेशल रेल्वेने बंद झालेल्या रेल्वे सेवा पूर्वपदावर येत आहेत. आज बुधवार दिनांक 21 जुलै रोजी दुपारी 3:45वाजता 07776 परळी वैजनाथ- आदिलाबाद  ही डेमु  स्पेशल ट्रेन रवाना झाली. यावेळी स्टेशन अधीक्षक जे. के. मीना, सेक्शन इंजिनिअर शिवकांत मळभागे,  रेल्वे पोलीस उपनिरीक्षक बालाजीराव गाणोरकर, पोलीस हवालदार सुभाषराव चोपडे, मुख्य लोको पायलट श्री अनिल वर्मा, सहाय्यक पायलट श्री ब्रिजेश वर्मा, लोको इंस्पेक्टर श्री राजेश  व गार्ड  श्री प्रकाश सावंत इत्यादींचा उचित सत्कार  करण्यात आला.

                 यावेळी श्री सोमनाथ स्वामी यांनी रेल्वे इंजिनची विधिवत पूजा केली. यावेळी परळी रेल्वे संघर्ष समितीचे  निमंत्रक सर्वश्री जी एस सौंदळे, प्राध्यापक सत्यनारायण दुबे, श्री संदीप तिळकरी सर, स्वप्निल रोडे, श्रावण आदोडे, सूर्यप्रकाश तुसाम,मुकुंदराव ताटे, आदित्य तुसाम, गजानन मुदिराज इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ही रेल्वेसेवा अनारक्षित असून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सामान्य तिकीट घेऊन उपलब्ध आहे. त्या साठी अगोदर आरक्षण करण्याची काहीच आवश्यकता नाही. मात्र एक्सप्रेस  गाडीचे  प्रवास भाडे आकारले जाईल.

          लॉक डाउन नंतर प्रथमच ही रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. परळी -आदिलाबाद ही रेल्वे दररोज दुपारी 3:45 वाजता परळी वैजनाथ येथून सुटेल. गंगाखेड ,परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर,सहस्रकुंड, किनवट, इत्यादी मार्गे आदिलाबादला रात्री 11:55 ला पोहोचेल. परतीच्या प्रवासामध्ये आदिलाबाद येथून ही रेल्वे पहाटे साडेतीन वाजता निघून परळी वैजनाथ येथे दुपारी बारा वाजता पोहोचेल. जास्तीत जास्त प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !