MB NEWS-दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता संकेतस्थळांवर उपलब्ध

 सगळेच पास होणार;नो टेन्शन....



दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता संकेतस्थळांवर उपलब्ध


बीड, दि .15 ::- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडाळांमार्फत 2021 मध्ये 10 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या संकेतस्थळांवर 16 जुलै रोजी दुपारी 1.00 वा जाहीर करण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

दहावी परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रिंट घेता येईल. तसेच www.mahasscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध होईल. 

औरंगाबाद मंडळ कार्यालयामध्ये सर्व प्रसार माध्यमांना निकाल वैशिष्ट्यांच्या माहिती पुस्तिकेचे वाटप 16 जुलै रोजी दुपारी 1.00 वा करण्यात येत असल्याचे विभागीय मंडाळाच्या विभागीय सचिवांनी कळविले आहे.

दहावी परीक्षा 2021 शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्या. शासन निर्णयातील मुल्यमापन कार्यपद्धतीनुसार 9 वी चा अंतिम निकाल, इयत्ता 10 वी च्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापन व 10 वी चे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मुल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे. दहावी परीक्षेत श्रेणी सुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधी मध्ये परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक, दोन संधी उपलब्ध राहतील, असेही कळविण्यात आले आहे. 

*****

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार