इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-परळी शहर पोलिस ठाण्याची गाडी नादुरुस्त; भरपावसात व रात्रीच्या वेळी मोटारसायकलवरुन गस्तीची अधिकार्यांवर वेळ

 परळी शहर पोलिस ठाण्याची गाडी नादुरुस्त; भरपावसात व रात्रीच्या वेळी मोटारसायकलवरुन गस्तीची अधिकार्यांवर वेळ

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    शहराचे प्रमुख प्रशासकीय केंद्र तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अशा शहर पोलीस ठाण्यात एक चारचाकी गाडी आहे तीही नादुरुस्त अवस्थेत असल्याने कामकाजात खोळंबा होत आहे.परळी शहर पोलिस ठाण्याची गाडी नादुरुस्त असल्याने भरपावसात व रात्रीच्या वेळी मोटारसायकलवरुन गस्त घालण्याची अधिकार्यांवर वेळ आली आहे.

        पोलीसांना देण्यात आलेल्या गाड्या आता खुप जुन्या झालेल्या आहेत.पोलीसांना नविन अद्यावत गाड्या उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी अनेक दिवसापासून मागणी आहे. पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी गेल्या २२जुन रोजी जिल्हा पोलिस दलात तब्बल १६५ नवीन वाहनांचे लोकार्पण केलेले आहे. मात्र परळी शहर पोलिस ठाण्याची गाडी तीन टायर खराब झाल्याने कित्येक दिवसांपासून जागेवरच उभी आहे.परळी शहर पोलिस ठाण्याची गाडी नादुरुस्त असल्याने भरपावसात व रात्रीच्या वेळी मोटारसायकलवरुन गस्त घालण्याची अधिकार्यांवर वेळ आली आहे.याकडे संबंधितांनी तातडीने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.

        परळीत पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता आहे.सीसीटिव्ही बंद आहेत.भौतिक साधनसामग्री च्या अनेक त्रुटी आहेत.त्यात नविन वाहने नाहीत.आहे त्या परिस्थितीत पोलीस काम करत आहेत.पोलीस बांधवांच्या प्रशासकीय कामकाजासाठी निदान अत्यावश्यक सुविधा तरी उपलब्ध असणे गरजेचे आहे.याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!