MB NEWS-राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त नागापूर येथे गरजू अपंगांना धान्याची कीट व मास्क वाटप

  राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू  कडू यांच्या वाढदिवसा निमित्त नागापूर येथे गरजू अपंगांना धान्याचे कीट व मास्क वाटप 



परळी वैजनाथ,, प्रतिनिधी

 राज्यमंत्री तथा प्रहार अपंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  ओमप्रकाश जी उर्फ बच्चू भाऊ कडू यांचा वाढदिवस नागापूर येथे प्रहार अपंग संघटनेचे परळी तालुका अध्यक्ष श्री नागनाथ श्री हरी सावजी यांच्या तर्फे गरजू अपंगांना धान्याची कीट व मास्क वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना प्रहारचे तालुका अध्यक्ष श्री नागनाथ सावजी यांनी बच्चुभाऊ यांनी दिव्यांग निराधार दीन दुबळे व शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरीव कार्याचा आलेख मांडला दिव्यांगांचे दैवत माननीय बच्चु भाऊ यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून आपण प्रत्येक वर्षी साजरा करतो बच्चू भाऊंच्या विचारानुसार आपण गत वर्षी वृक्षरोपण करून साजरा केला व आज हे रोपटे जोपासून आज वृक्षामध्ये रुपांतरीत झाले आहे याबाबत समाधान व्यक्त केले तसेच यावर्षी आपण बच्चुभाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने गरजू दिव्यांगांना सात किलो धान्याचे कीट व मास्क वाटप करून फुल ना फुलाची पाकळी स्वरूपात बच्चु भाऊंच्या सामाजिक कार्यात उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न करत असून आपण सर्वांनी भाऊंच्या कार्याचा आदर्श घेऊन आपणही त्यांचे विचार आचरणात आणावे हे त्यांच्या वाढदिवसाचे फलित आहे.

याप्रसंगी वारकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प. धनंजय महाराज सोळंके यांचे समुचित भाषण झाले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वस्वी श्री किरण सोळंके, विठ्ठल मुसळे, धनंजय एसके दत्ता एसके विलास तेलंग विठ्ठल सोळंके नागनाथ आप्पा सोळंके शेख इमाम मधुकर जुजगर शिवाजी सोळंके भगवान सोळंके आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमास असंख्य दिव्यांग बंधू-भगिनी व नागरिक उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन श्री किरण सोळंके यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार