युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-राख प्रदुषणाविरोधात कन्हेरवाडी येथे दोन तास रास्तारोको राख वाहतुक बंद झाली नाही तर राख प्रशासनाच्या दारात आणून टाकू- माणिक फड

 राख प्रदुषणाविरोधात कन्हेरवाडी येथे दोन तास रास्तारोको 



 राख वाहतुक बंद झाली नाही तर राख प्रशासनाच्या दारात आणून टाकू- माणिक फड 

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
  औष्णिक विद्युत केंद्र परळी येथून अवैद्य राख दाऊतपुर शिवारातून हजारो टन अवैध राख अवैधरित्या वाहतूक केली जाते याकडे आरटीओ ,पोलीस प्रशासन व तहसिल  प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे परळी परिसर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.या अवैध राख वाहतुकीविरोधात परळी-अंबाजोगाई मार्गावर कन्हेरवाडी ग्रामस्थांनी दोन तास रास्तारोको केला. या आंदोलनाला गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला 



आठ दिवसात अवैध राख वाहतूक करणारी वाहने बंद केले नाही तर  समस्त गावकऱ्यांच्या वतीने वाहने अडवून वाहनांचे नुकसान केले जाईल असावा इशारा माणिकभाऊ फड यांनी दिला. तसेच राख वाहतूक करणाऱ्या हायवा बंद झाल्या नाहीतर राख प्रशासनाच्या दारात आणून टाकू असा इशारा देण्यात आला आहे. 
        यावेळी माणिक फड , भास्कर रोडे (रिपाई राज्य सचिव )यांनी सदर आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी नगरसेवक प्रा.पवन मुंडे, माऊली दादा फड ,सुरेश ( नाना )फड, निवृत्ती आप्पा फड ,समाधान मुंडे, विशाल रोडे ( ग्रा.प सदस्य ), कैलास फड. अंबादास रोडे ,महादेव आप्पा रोडे आदी सहभागी झाले.   कन्हेरवाडी येथे आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी परळीचे नायब तहसीलदार बी एल रुपनर ,ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि मुंडे ,तलाठी विष्णू गीते व इतर कर्मचारी हजर होते.यावेळी परळी व अंबाजोगाई या दोन्ही बाजुने दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.नायब तहसिलदार बी.एल.रुपनर यांना ग्रामस्थांच्या वतिने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या