MB NEWS-परळीकरांच्या सेवेत स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोक्षवाहिनी स्वर्गरथाचे लोकार्पण !*

 *परळीकरांच्या सेवेत स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोक्षवाहिनी स्वर्गरथाचे लोकार्पण !*

🕳️  *ट्रस्टचे सामाजिक दायित्व कौतुकास्पद- विजयप्रकाश तोतला*


 🕳️  *स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारींच्या जनसेवेचाच हा वारसा - श्रीकांत मांडे*

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       परळीचे एक दानशूर व्यक्तिमत्व तत्कालीन काँग्रेसचे नेते व परळीचे माजी नगराध्यक्ष माणिक बाजीराव धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ना.धनंजयजी मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली "आरोग्य सेवासप्ताह" च्या निमित्ताने स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने "मोक्षवाहिनी स्वर्गरथ" चे लोकार्पण माजी नगराध्यक्ष विजयप्रकाशजी तोतला व माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, जेष्ठ नेते श्रीकांत मांडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.ट्रस्टचे सामाजिक दायित्व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विजयप्रकाश तोतला यांनी केले. तर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात हा ट्रस्ट अग्रेसर आहे. स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारींच्या जनसेवेचाच हा वारसा असल्याचे श्रीकांत मांडे यांनी सांगितले.



          परळीचे वाढते शहrरीकरण बघता अजून एक "स्वर्गरथ" ची आवश्यकता भासत होती. तेंव्हा ही गरज ओळखून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे वाहन नगर परिषद परळी वैजनाथ यांना देण्यात आले. यावेळी स्वच्छता निरीक्षक श्रावन घाटे यांना प्रतिकात्मक चावी भेट देवून वाहन सुपूर्द करण्यात आले.स्वर्गरथ सेवा ही पूर्णपणे मोफत असणार आहे.या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला,जाबेर खान पठाण,सुरेश टाक,अय्युब भाई पठाण,डॉ.संतोष मुंडे,अझीज कच्छी,वैजनाथ बागवाले,वैजनाथ सोळले,अनंत इंगळे,अनिल आष्टेकर,नितीनमामा कुलकर्णी, गोविंद कुकर,डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, श्रीकांत मांडे,शंकर कापसे,डॉ. आनंद टिंबे,रमेश चौंडे,सचिन स्वामी,के.डी. उपाडे,रवी मुळे,लालाखान पठाण, प्रा. शामसुंदर दासूद, सुभाष वाघमारे,शेख मुख्तार, सयद अली,अमर रोडे,शशीकांत बिराजदार,अनिल घेवारे,जितेंद्र नव्हाडे,बळीराम नागरगोजे,पवन फुटके,रमेश मस्के,विष्णू साखरे,भागवत गित्ते,शरद कावरे,प्रदीप जाधवर,राज जगतकर,प्रताप धर्माधिकारी, रत्नाकर कुलकर्णी, अभिजित धाकपाडे,नरसिंग गायकवाड, राजाभाऊ स्वामी,आदी मान्यवर  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !