MB NEWS-ओबीसींना राजकीय आरक्षण द्या या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने निवेदन*

 *ओबीसींना राजकीय आरक्षण द्या या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने  निवेदन*



परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)

         महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने ओबीसींना राजकीय आरक्षण द्या, यासाठी आवश्यक इंम्पेरियल डाटा सुप्रीम कोर्टात दाखल करा,ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा या व इतर मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी (दि.०२) लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याचाच एकभाग म्हणून येथे या विविध मागण्यांचे निवेदन येथील तहसीलदार सुरेश शेजूळ यांना देण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

          महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा औरंगाबाद विभागांतर्गत येथे महाराष्टातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील रद्द केलेले ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवणे करीता आवश्यक इम्पेरियाल डाटा ताबड़तोब सुप्रीम कोर्टात सादर करुन ओबीसी आरक्षणाचा स्थगिति आदेश रद्द करुन केंद्र व राज्य सरकार द्वारा ओबीसीची जातिनिहाय जनगणना करुन ओबीसी आरक्षणाचा कायद्या संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करावा या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडीच्या वतीने खासदार रामदासजी तडस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महासचिव प्राचार्य डॉ भूषण कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने येथील तहसीलदार सुरेश शेजूळ यांना या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आंबेडकरी,फुले, शाहू चळवळीचे भगवान साकसमुद्रे यांनी ओबीसी आरक्षणास पाठिंबा दिला. निवेदनावर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे औरंगाबाद कार्याध्यक्ष प्रा.प्रविण फुटके, युवा आघाडी औरंगाबाद विभागाचे सचिव अतुल बेंडे, शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर जठार, सहसचिव प्रा.मधुकर शिंदे, नागनाथ भाग्यवंत, मल्लिकार्जुन साखरे, सतिष फुटके, विजय राऊत,पत्रकार दत्तात्रय काळे, पत्रकार जगदीश शिंदे, पत्रकार भगवान साकसमुद्रे, फुलचंद काळे आदी ओबीसी बांधव ,पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार