MB NEWS-परळी येथे पारंपरिक पद्धतीने प .पू. वामनानंद महाराजांची पुण्यतिथी ; कोरोना संकट दूर होण्यासाठी प्रार्थना

 🌑 *परळी येथे पारंपरिक पद्धतीने प .पू. वामनानंद महाराजांची पुण्यतिथी ; कोरोना संकट दूर होण्यासाठी प्रार्थना



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेड चे मठाधिपती ब्र .ली. प .पू. वामनानंद गुरु पुरूषोत्तमानंद महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे परळीत ३ जुलै रोजी कोविडविषयक नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते.पारंपारिक पद्धतीने विधीवत पूजा करून शिष्यवृंदांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.यावेळी समस्त भक्तगणांनी कोरोना संकट दूर होण्यासाठी प्रार्थना केली.



          विठ्ठल मंदिर मंदिर , देशपांडे गल्ली, गणेश पार परळी वैजनाथ  येथे आज  ज्येष्ठ वद्य नवमी दि . ०३ I ०७I २०२१ रोजी  प्रतिवर्षाप्रमाणे ब्र .ली. प .पू. वामनानंद गुरु पुरूषोत्तमानंद महाराजांच्या *पुण्यतिथी* उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी ९ वा . श्री गुरु वामनानंद महाराजांच्या प्रतिमा पूजनविधी विश्वंभर देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. उपस्थित भक्तगणांनी श्रीगुरू पंचपदी घेतली.. आरतीनंतर समस्त भक्तगणांनी कोरोना संकट दूर होण्यासाठी सामुहिक प्रार्थना केली. सर्वांनी कोविडविषयक नियमांचे पालन करून सहभाग नोंदवला. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !