MB NEWS-पत्रकार सुरक्षा समितीच्या गंगाखेड व पालम तालुका अध्यक्षांना पत्रकार सुरक्षा समितीचे ओळख पत्र

 पत्रकार सुरक्षा समितीच्या गंगाखेड व पालम तालुका अध्यक्षांना पत्रकार सुरक्षा समितीचे ओळख पत्र 



पालम /प्रतिनिधी :- पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज दि -०१/०७/२०२१ वार गुरुवार रोजी ..पालम येथे पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार साहेब यांच्या आदेशानुसार परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडीचे ओळख पत्र गंगाखेड व पालम तालुकाध्यक्ष यांना देण्यात आले. यावेळी लष्कर वार्ता चे संपादक शेषेराव सोपने, संपादक सम्यक वर्तमानकाळ तथा पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा सरचिटणीस विनोद कांबळे, शहराध्यक्ष अवधूत जाधव कार्यकारिणी सदस्य शशिकांत पौळ, पत्रकार शिवाजी शिंदे , पत्रकार चांद तांबोळी, पत्रकार कळंबे, यांच्या उपस्थितीत दोन तालुकाध्यक्षांना पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र समितीचे ओळख पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संपादक विनोद कांबळे यांनी पत्रकार व त्यांची सुरक्षा यावर सखोल मार्गदर्शन केले व तालुक्यातील सर्व पत्रकारांना आव्हान केले की सर्वांनी एकसंघ एक संघटक म्हणून कार्य करा व सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा , त्यानंतर संपादक सोपणे यांनी ही पत्रकारांचे हक्क अधिकार याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच नवनियुक्त अध्यक्ष यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहु अशी ग्वाही दिली. त्यानंतर सर्व उपस्थित पत्रकरांने आपले मनोगत व्यक्त केले व नवनियुक्त अध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कांबळे तर आभार प्रसाद पोळ यांनी मानले.

महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हलल्याचे प्रमाण वाढत आहे तर गाव पातळीवर ही हे प्रमाण वाढत आहे यावर चिंता व्यक्त केली व आपण पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी मा.यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली सदेव प्रयत्न करनार असेही यावेळी जिल्हाध्यक्ष प्रसाद पौळ यांनी मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !