युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीत आज आंदोलन मंगळवार ; तीन ठळक आंदोलनांचे आयोजन

 परळीत आज आंदोलन मंगळवार ; तीन ठळक आंदोलनांचे आयोजन



   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       उद्याचा मंगळवार आंदोलन मंगळवार ठरणार आहे.परळीत तीन ठळक आंदोलने आयोजित करण्यात आली आहेत.महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.बारा आमदारांचे निलंबन केले म्हणून राज्य सरकार चा निषेध करण्यासाठी भाजपने आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे तर अवैध राख वाहतूकीच्या विरोधात कन्हेरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे युवानेते माणिक फड यांनी सांगितले आहे.


 🌑भाजपचे आंदोलन...

       महाराष्ट्र विधानमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकशाहीला टाळे ठोकण्यासाठी* *भारतीय जनता पार्टीच्या निर्दोष बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता   तहसील कार्यालय येथे आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलनकरण्यात येणार आहे.

 🌑 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने....

       केंद्रातील मोदी सरकारने पेटोल, डिझेल व एलपाजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत.  यामुळे सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या संकटाने आधीच जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल- डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. याच्या निषेधार्थ ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. मंगळवारी (दि.६) सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

  🌑 कन्हेरवाडी येथे  रास्तारोको....

          गेली अनेक वेळा राख वाहतुकी संदर्भात प्रशासनाला विनंती,निवेदन देऊन ही अद्याप अवैदध राख वाहतुकीवर कुढलेही निर्बंध लावले जात नसल्यामुळे कन्हेरवाडी ग्रामस्थांना सोबत घेऊन कन्हेरवाडी येथे परळी अंबाजोगाई रोडवर मंगळवारी सकाळी 8-30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे युवानेते माणिक भाऊ फड यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या