MB NEWS-जिरेवाडी या गावाला सतत चौथ्यांदा एलआयसी तर्फे विमा ग्राम पुरस्कार* *_जिरेवाडी गावचा आदर्श घेत इतर ग्रामपंचायतीने विमा ग्राम पुरस्कार मिळवावा - शाखाधिकारी सुधीर कांत_*

 *जिरेवाडी या गावाला सतत चौथ्यांदा एलआयसी तर्फे विमा ग्राम पुरस्कार*



*_जिरेवाडी गावचा आदर्श घेत इतर ग्रामपंचायतीने विमा ग्राम पुरस्कार मिळवावा - शाखाधिकारी सुधीर कांत_*




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - परळी तालुक्यातील जिरेवाडी या गावाला एलायसीचा बिमाग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले.जिरेवाडी परिसरात असलेल्या अयोध्या नगर मध्ये असलेल्या श्री राम मंदिर येथे बीमाग्राम पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


भारतीय जीवन बीमा निगम शाखा अंबाजोगाई यांच्या कडुन हा पुरस्कार जिरेवाडी गावाला वितरित करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर कांत शाखाधिकारी परळी प्रमोद भालेराव विकास अधिकारी परळी, बालासाहेब मुंडे मुख्य विमा सल्लागार तसेच विमा प्रतिनिधी दिगंबर मुंडे श्रीहरी गुट्टे या सर्वांच्या उपस्थिती मध्ये एक लाख रुपये चेक देण्यात आला.


पुढील वर्षीही आम्ही हा पुरस्कार निश्चित मिळवू असा विश्वास सरपंच गोवर्धन मुंडे यांनी व्यक्त केला. जिरेवाडी या गावाचा आदर्श घेऊन इतर ग्रामपंचायतीने देखील विमा ग्राम पुरस्कार मिळवावा असे उद्गार सुधीर कांत यांनी काढले

या कार्यक्रमाला उपसरपंच शिवाजी मुंडे ग्राम पंचायत सदस्य निवृती मुंडे,नरेश मुंडे ,अंगद कांदे,माजी सैनिक महादेव फड,ग्रामसेवक गोरे, ज्ञानोबा मुंडे सर,मारोती ढाकणे, रंगनाथ मुंडे, सुधाकर गिते, प्रकाश चव्हाण यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार