MB NEWS- *खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पित घणशी नदी पुनरुज्जीवन उपक्रमाला मुर्त रुप !* *_अजितदादांच्या वाढदिवसालाच भरलेल्या बंधार्यावर ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपुजनचा अपुर्व योग !_*

खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पित घणशी नदी पुनरुज्जीवन उपक्रमाला मुर्त रुप !


अजितदादांच्या वाढदिवसालाच भरलेल्या बंधार्यावर ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपुजनचा अपुर्व योग !

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित"आठ दशके कृतज्ञतेची" अभियानात "स्वाभिमान महोत्सव" मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा घणशी नदी पुनरुज्जीवन उपक्रम हाती घेण्यात आला होता. नगर परिषद च्या माध्यमातून साखळी बंधारा बांधण्यात आला.नगर परिषदेला पुरस्कार मिळाला. हा बंधारा आता तुडुंब भरून वाहत आहे.अजितदादांच्या वाढदिवसालाच भरलेल्या बंधार्यावर (दि.२२) रोजी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपुजनचा अपुर्व योग आला.परळीकरांसाठी हा जलस्रोत उपयुक्त ठरणारा आहे.

   भारताचे माजी कृषिमंत्री पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित"आठ दशके कृतज्ञतेची" अभियानात "स्वाभिमान महोत्सव" मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा या नदी मध्ये एकदिवसीय श्रमदान झाले होते आणि हा प्रकल्प ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा संकल्प केला होता.अजितदादांचा वाढदिवस आणि हा बंधारा ओसंडून वाहीला हा एक सुवर्णक्षण आहे. प्रकल्प 75% पूर्ण झाला असून सुशोभिकरणं चे काम कार्यान्वीत आहे.लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्प पूर्णत्वास जायच्या अगोदरच नगर परिषद परळी वैजनाथ पालिकेस राज्यात चौथा"वसुंधरा पुरस्कार" प्राप्त झाला आहे.      


    

    राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेतून नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या सहकार्याने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या पुढाकारातून परळी ते चांदापुर रोड वरील घणशी नदीचे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत साखळी सिमेंट बंधारा,नदी सरळीकरण व खोलीकरणं काम झाले असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसादिनी बंधारा ओसंडून वाहत आहे.या बंधाऱ्याचा जुन्या गाव भागाला खूप मोठा लाभ होणार आहे.

        नगर परिषद परळी वैजनाथ द्वारा बांधण्यात आलेल्या परळी-चांदापूर रोडवरील घणशी नदीवर साखळी सिमेंट बंधारा ओसंडून वाहत आहे. दि.२२ रोजी राज्याचे सामजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.जुन्या गाव भागाला या प्रकल्पामुळे लाभ होणार आहे.या जलपूजन कार्यक्रमास आ.संजय दौड,नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे,शिवाजी शिरसाठ, प्रा. मधुकर आघाव, माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण,वैजनाथ सोळंके, तुळशीराम पवार,रवींद्र परदेशी, नगरसेवक अय्युब पठाण, गोविंद मुंडे, श्रीकृष्ण कराड,गोपाळ आंधळे, अनिल आष्टेकर,अमर देशमुख, वैजनाथ बागवाले, जयराज देशमुख, शिवाजी देशमुख, दिपक तांदळे,रवी मुळे,शुभम देशमुख,गोविंद कुकर,मुन्ना बागवाले,किरण सावजी,चारुदत्त करमाळकर,शरद कावरे,अमर रोडे,राज जगतकर,प्रताप समीनदरसावळे, निलेश वाघमारे,श्रीपाद पाठक,अनिल घेवारे,नितीन बागवाले,अभिजित तांदळे प्रताप धर्माधिकारी, राम कुकर,बाबा सरवदे,शाम कुकर, यांच्यासह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार