MB NEWS-जीवाच्या आकांत भयाने कासावीस पाडस, भेटला जीवनदाता कुणीतरी....! ⬛ माॅर्निंगवाॅकला गेलेल्या प्रदीप अग्निहोत्री सह नागरिकांनी वाचविले हरिणाच्या पाडसाचे प्राण

 जीवाच्या आकांत भयाने कासावीस पाडस, भेटला जीवनदाता कुणीतरी....!



⬛ माॅर्निंगवाॅकला गेलेल्या प्रदीप अग्निहोत्री सह नागरिकांनी वाचविले हरिणाच्या पाडसाचे प्राण


परळी (प्रतिनिधी).....

        चिमुकलं निरागस हरणाचं पाडस, सुर्योदयाच्या मुक्त हळुवार गारव्याच्या अलगद वातावरणात मुक्तछंदाने परळीजवळच्या मालेवाडी रस्त्यावरील डोंगरी वनराईत बागडतांना तावडीत सापडलो चार कुत्र्यांच्या अन् अनर्थच ओढवला. जीवाच्या आकांताने धाव धाव धावलं पण कुत्र्यांच्या कचाट्यातून काही सुटका करून घेता येत नव्हती.व्याकुळ,व्याकुळ होऊन निस्तब्ध जागेवर कोसळलं.तोपर्यंत कुत्र्यांनी छोटेसे लचकेही तोडले.पण त्याचवेळी सुदैवाने माॅर्निंगवाॅकला गेलेल्या प्रदीप अग्निहोत्री सह नागरिकांनी मोकार कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली व  हरिणाच्या या पाडसाचे प्राण वाचविले.

        परळी शहरापासून जवळच असलेल्या मालेवाडी रस्त्यावर डोंगरी वनराई आहे.सकाळच्यावेळी अनेक नागरिक या रस्त्यावर फिरायला जातात. परंतु डोंगरावर खुप कमी जण जातात.यामध्ये परळीतील अंबेवेस भागातील रहिवासी असलेले व बाजारपेठेतील व्यावसायिक प्रदीप अग्निहोत्री व त्यांचे दोन-तीन सहकारी नियमितपणे सकाळी येथे फिरायला जातात. या ठिकाणी सकाळच्या प्रहरी दुरवर बागडणारे हरिणं,होतं आदी पशुपक्षी नेहमीच दिसून येतात.आज दि.१ जुलै रोजी नेहमीप्रमाणे ते फिरायला गेलेले असताना चार मोकार कुत्र्यांच्या तावडीत हरणाचे एक पाडस सापडल्याचे दुरुन पाहिले. जीवाच्या आकांताने हे पाडस निपचित पडले होते आणि सभोवती मोकार कुत्रे लचके तोडण्याच्या तयारीत होते.प्रदीप अग्निहोत्री व त्यांचे सहकारी अनंत भातांगळे,दत्ता पुरी,सुधीर जोशी, बंडु बागवाले, प्रल्हाद काळे आदी सहकर्यांनी धावत जाऊन या कुत्र्यांना दुर हाकलून लावले मात्र परत परत हे कुत्रे या पाडसाचा माग काही सोडत नव्हते.शेवटी एक जण या जखमी पाडसाजवळ थांबवून इतरांनी या मोकार कुत्र्यांना पिटाळून लावले. नागरीकांच्या सतर्कतेमुळे या पाडसाला जीवदान मिळाले.

       जखमी पाडसाबाबत नागरिकांनी वन विभागाचे अधिकारी दौंड यांना कळवले.वनाधिकारी दौंड यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली व या पाडसाला उपचारासाठी घेऊन गेले.पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असुन आता हे हरिणाचे पाडस सुखरुप आहे.

     🕳️ मोकार कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.....

       दरम्यान,मालेवाडी रस्त्यावर डोंगरी वनराई क्षेत्रात हरिणांची मोठी संख्या आहे.सकाळी कळपांनी हरिणं याठिकाणी बागडताना दिसतात.परंतु गेल्या काही दिवसांपासून चार पाच मोकार कुत्र्यांचा कळपही याठिकाणी सक्रिय झाला आहे.या मोकार कुत्र्यांचा वन्यप्राण्यांना धोका आहे.यामुळे मोकार कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी पुढे येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार