MB NEWS- *आरोग्य सेवासप्ताह: ६०० जणांचे लसीकरण व हजारोंनी घेतला सर्वरोग निदान शिबीराचा लाभ*

 *आरोग्य सेवासप्ताह: ६०० जणांचे लसीकरण व हजारोंनी घेतला सर्वरोग निदान शिबीराचा लाभ*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये आज दि.२१ रोजी सकाळी ९ वा.पासुन लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये  ६०० जणांचे लसीकरण तसेच हजारोंचे  सर्वरोग निदान शिबीरात निदान करण्यात आले. त्याचप्रमाणे सेवाधर्म सन्मान करण्यात आले.




                 लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आज बुधवार दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ९ वा.पासुन सर्वरोग निदान  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य सेवासप्ताह च्या माध्यमातून  लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यामध्ये 500 कोविशिल्ड व 100 कोवक्सिन लसीकरण झाले.आरोग्य तपासणी व लसीकरण साठी सहाय्य डॉ.आनंद टिंबे,रोशन मुंडे,प्रतिभा हनवते, राजेश्वरी तरकसे,हरिष ताटे,शैलेश ताटे,छाया रणदिवे,अनिता गिराम,सुरेखा भिसे,आम्रपाली घनघाव,हेमा काळे,कल्पना कराड,मुक्ता नेमाडे,दीपाली आरसुळे, शामल गित्ते, ज्योती आरसुळे,सविता राठोड,रेखा येमले, भंडारे मॅडम,ज्योती आंधळे, सुजाता चव्हाण कल्पना ढाकणे याआरोग्यसेविक यांनी आपले योगदान दिले. यावेळी सुभाष ठक्कर ऑक्सिजन पुरवठा,स्वच्छता निरीक्षक श्रावण घाटे, आरोग्य अधिकारी एस.एम.वैद्य, नप कर्मचारी प्रविण मोगरकर यांचा सेवाधर्म सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.



     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे होते तर उद्घाटक-व्यंकटेश शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख उपस्थित होते.यावेळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,ज्येष्ठ नेते साहेबराव चव्हाण,शहर सरचिटणीस अनंत इंगळे,ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे,माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले,माजी जि प सदस्य विजयकुमार गंडले,संघर्ष ग्रुपचे रमेश गित्ते,माजी नगरसेवक रवी मुळे,सुभाष वाघमारे,रमेश पवार, के.डी. उपाडे,राजाभाऊ स्वामी,दिनेश गजमल,अजय जोशी सर, मनजीत सुगरे,जयदत्त नरवटे,महेंद्र रोडे,प्रा.शाम दासूद, नवनाथ जोगदंड,शंकर कापसे, बळीराम नागरगोजे, शरद कावरे,गिरीष भोसले,सुरेश नानावटे, पवन फुटके, राहुल जगतकर,अमर रोडे,राज जगतकर,शशी बिराजदार, जितेंद्र नव्हाडे,मजास इनामदार, अमित केंद्रे,प्रदीप जाधवर,संकेत दहीवडे, बालाजी मस्के,धम्मा अवचारे, श्रीकांत माने,पप्पू काळे, शेख मुख्तार,शेख शारेख, रावसाहेब जगतकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !