MB NEWS-आषाढी वारीवर निर्बंध निषेधार्य;विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळीत निवेदन*

 *आषाढी वारीवर निर्बंध निषेधार्य; विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळीत निवेदन* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.सरकारच्या या जुलमी निर्णयाच्या विरोधात विश्व हिंदू परिषदने परळीत आज दि.१६ जुलै रोजी निषेध आंदोलन केले. याबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.  

     शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.अगदी निजाम राजवटीतही वारी सुरुच होती.वारीला कोणतीही आडकाठी नव्हती.सध्या राज्यात असणाऱ्या तीन पक्षांच्या सरकारने मात्र वारीवर निर्बंध घातले आहेत.हा निर्णय चुकीचा आहे.सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.कोरोनाविषयक नियम पाळून मर्यादित संख्येत पंढरपूरला जाण्याची तयारी दर्शवली होती.वारी २० दिवसांऐवजी १० दिवस करावी.गरज असेल तर केंद्रीय पोलिस बल मागवावे.दिवसा वारीमुळे संसर्गाचा धोका असेल तर रात्रीच्या वेळी जाण्याची परवानगी द्यावी.मुक्काम गावाबाहेर करण्यासह आणखी काही नियमांचे पालन करत वारीला  परवानगी मागितली होती.पण सरकार तयार झाले नाही.

      सरकारने वारीला परवानगी नाकारल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने  निवेदन देताना  प्रखंड अध्यक्ष सौ.वर्षा ताई अनिल जोशी,जिल्हा पालक मंत्री श्रीपाद कुलकर्णी, प्रखंड उपाध्यक्ष अरुणा ताई परळीकर, जगदीश पाठक, प्रखंड मंत्री शैलेश पांडे,अनंता महाराज जोशी वडगाव, लोखंडे वडगाव, कल्पनाताई चाटूरीकर देशपांडे आदींसह     पदाधिकारी उपस्थिती होती.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार