इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण मुखी गणपती मंदिरात विद्यार्थी विद्यार्थी सेनेच्या वतीने महाआरती

 महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखला उदंड आयुष्य मिळो -अभयकुमार ठक्कर


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण मुखी गणपती मंदिरात विद्यार्थी विद्यार्थी सेनेच्या वतीने महाआरती 



परळी l प्रतिनिधी

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा वाढदिवस परळी वैजनाथ येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने परळी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अंगारकी चतुर्थी असल्यामुळे जागृत समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुखी गणपती मंदिर येथे महाआरती करून ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांना उदंड आयुष्य लाभो असे साकडे घालण्यात आले.

संपूर्ण जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे, महाराष्ट्रावर वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती दूर कर व या महाराष्ट्रातील जनतेला प्रत्येक संकटाला तोंड देण्याची शक्ती दे अशी प्रार्थना शिवसेना बीड जिल्हा उप प्रमुख तथा बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या वतीने करण्यात आली. 

यावेळी शिवसेना मा. तालुका प्रमुख जगन्नाथ साळुके,मा.उप शहर प्रमुख सतिष जगताप, शहर संघटक संजय कुकडे,विद्यार्थी सेना जिल्हा उप प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना उप शहर प्रमुख किशन बुंदेले,मा.उप शहर प्रमुख सचिन स्वामी,शिवसेना विभाग प्रमुख संजय सोमाणे,बबन ढेंबरे,विद्यार्थी सेना तालुका समन्वयक अमित कचरे, शहर प्रमुख गजानन कोकीळ,मनिष जोशी, प्रकाश देवकर, योगेश जाधव, दिपक जोशी, शिवकुमार चौंडे,महादेव ढेंबरे,नावनथ वरवटकर,योगेश घेवारे, अशोक चव्हाण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या