MB NEWS-कचरा डेपोचे नागरिकांनी मांडले पंकजाताई मुंडेंकडे गाऱ्हाणे ; नव्या कचरा डेपोवर प्रत्यक्ष जाऊन केली स्थळ पहाणी

 *कचरा डेपोचे नागरिकांनी मांडले पंकजाताई मुंडेंकडे गाऱ्हाणे ; नव्या कचरा डेपोवर प्रत्यक्ष जाऊन केली स्थळ पहाणी*


*नागरिकांचे आरोग्य आणि वन्यजीवांच्या रक्षणाकडे  लक्ष देण्याबाबत न.प.कडून व्यक्त केली अपेक्षा*


परळी । दिनांक ३१।

नगरपरिषदेच्या नव्या कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्यात आल्याने  नागरिकांनी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचेकडे याविषयावर गाऱ्हाणे मांडून लक्ष देण्याची मागणी केली. नागरिकांच्या या प्रश्नाची  दखल घेत पंकजाताई मुंडे यांनी या कचरा डेपोची पाहणी केली. याप्रश्नाकंडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष देणार असल्याचे त्यांनी नागरिकांना अश्वासित केले.तर नागरिकांचे आरोग्य आणि वन्यजीवांच्या रक्षणाकडे लक्ष देण्याबाबत न.प.कडून   अपेक्षा व्यक्त केली

परळी शहराबाहेर असलेल्या नंदागौळ रस्त्यावरील खदान परिसरात नगर परिषदेकडून होणारा कचऱ्याचा साठा परिसरातील नागरीक, वन्यजीव आणि निसर्गाच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. यासंदर्भात शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत पंकजाताई मुंडे यांची आज निवासस्थानी भेट घेतली, त्यांच्या मागणीनंतर त्यांनी या कचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली.यासंदर्भात पत्रकारांशी बोलतांना पंकजाताई म्हणाल्या की, नगर परिषदेने ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे विघटन करणे आवश्यक आहे.परंतु तसे न करता केवळ कागदोपत्री दाखवून  ड्रेनेज लाईन मंजूर करून घेतली. शहरातील नागरीकांनी तक्रार केल्यानंतर खदान परिसराची पाहणी केली. कचरा डेपोच्या बाजूला वन खात्याची जमीन असल्याने तिथे वन्य जीवांचा संचार असतो. या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आणि वन्यजीवांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याच्या रक्षणासाठी याविषयात गांभीर्याने लक्ष देणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ यांचेसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !