MB NEWS-परळीमार्गे रेल्वे गाड्या व दुहेरी रेल्वे मार्गासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे प्रयत्नशिल

 परळीमार्गे रेल्वे गाड्या व दुहेरी रेल्वे मार्गासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे प्रयत्नशिल



भाजपाच्या वतीने विभागीय व्यवस्थापकांना निवेदन

परळी वैजनाथ (प्रतिनीधी)
 परळी हे सिकंदराबाद झोनमधील महत्वाचे रेल्वे स्टेशन असल्याने परळीमार्गे रेल्वे गाड्या सुरु करणे व परळी- लातुर रोड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासंदर्भात बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे या प्रयत्नशिल असुन त्यांच्या सुचनेवरुन भाजपा पदाधिकार्यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  
बीड जिल्ह्यातील एकमेव व सिकंदराबाद झोनमधील महत्वाचे रेल्वे स्टेशन व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाचे क्षेत्र असलेल्या परळी येथे देशभरातून भाविक येत असतात परळी येथुन उत्तर भारत व मध्य भारतात जाण्यासाठी नविन रेल्वे असाव्यात अशी रेल्वे प्रवाशातुन मागणी होती.बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे या परळीतील रेल्वेप्रश्नी रेल्वेप्रश्नी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत आल्या असुन आज दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अभयकुमार गुप्ता यांना लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेवरून निवेदन देण्यात आले असता श्री.गुप्ता यांनी सांगितले की, परळी वैजनाथ रेल्वेे स्टेशन हे महत्वाचे रेल्वे स्टेशन असुन यास मार्गावरून जास्तीत जास्त रेल्वे चालु करण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल.
या निवेदनात हैद्राबाद- उदगिर-परळी- सुरत-अहमदाबाद- गांधीधाम., बिदर-उदगिर- परळी- अकोला- अंबाला- जालंधर कॅन्टोनमेंट- जम्मु तवी तसेच मछलीपट्टनम ते बिदर एक्सप्रेस ही परळी पर्यंत वाढविण्यात यावी या रेल्वे गाड्या सुरु करण्याबरोबरच नांदेड- बेंगलोर ही हंपी एक्सप्रेस रेल्वे आदीलाबाद पर्यंत सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याबरोबरच लातुर रोड ते परळी दरम्यानच्या रेल्वे दुहेरी महामार्गास मान्यता मिळाली असुन या दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरु करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. भाजपाच्या वतिने देण्यात आलेल्या या निवेदनाच्या शिष्टमंडळात सतीश मुंडे, जुगलकिशोर लोहिया, शांतीलाल जैन, राजेश गित्ते, अरुण पाठक, शेख अब्दुल करीम, उमेश खाडे, राजेंद्र ओझा, नितीन समशेट्टी, पवन मोदाणी, मोहन जोशी, सचिन गित्ते, धनराज कुरील, रमेश गायकवाड, विनायक गडदे, बाबा शिंदे, प्रशांत कराड, अजय गित्ते, विकास हालगे यांच्यासह उपस्थित होते....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार