MB NEWS- *संस्कार व मुल्यवर्धन उपक्रम:परळीत गीता परिवारच्या वतीने गुरुपौर्णिमा व आॅनलाईन स्पर्धांचे पारितोषिक वितरण !*

 *संस्कार व मुल्यवर्धन उपक्रम: परळीत गीता परिवारच्या वतीने गुरुपौर्णिमा व आॅनलाईन स्पर्धांचे पारितोषिक वितरण !*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      संस्कार व मुल्यवर्धन करण्याच्यादृष्टीने गीता परिवारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात.लाॅकडाउनच्या काळात विविध आॅनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमा उत्सव व आॅनलाईन स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



        परळी गीता परिवारच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव समारंभ घेण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व जयपाल लाहोटी उपस्थित होते.दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.चिमुकल्या मुलांनी स्वागतगीत व गुरुवंदना गायन करुन उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.चि.अथर्व पवन बंग याने तोटकाष्टकम् चे महत्व सांगितले. मराठवाडा विजेता ठरलेल्या स्वरश्री व तन्वी सुजीत डोंगरे यांनी तोटकाष्टकम् चे काव्यमय सादरीकरण केले. 



        गीता परिवारच्या वतीने .लाॅकडाउनच्या काळात विविध आॅनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये अथर्वशीर्ष पठण, रामरक्षा स्तोत्र पठण, नेत्यांच्या वेशभूषा, गुरुपौर्णिमा निमित्ताने तोटकाष्टकम् पठण,मेरे जीवन में गुरु का स्थान व मेरे प्रिय गुरु या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र स्तरावर प्रथम पारितोषिक विजेते  श्लोक शिवप्रसाद बजाज(नेत्यांची वेशभूषा स्पर्धा), अथर्व बंग (रामरक्षा पठण स्पर्धा), स्वरश्री व साध्वी डोंगरे (तोटकाष्टकम पठण स्पर्धा), निबंध स्पर्धा उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवलेल्या संध्या सुधाकर दहिफळे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.मिनल लोहिया यांनी केले.तर आभार प्रदर्शन पुनम लाहोटी यांनी केले.



        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गीता परिवारच्या अध्यक्षा सौ.श्वेता आशिष काबरा, उपाध्यक्ष गोपाल लाहोटी, योगेश जाजु, जगदीश मंत्री, सचिव राजकन्या मंत्री, कोषाध्यक्ष ललिता जाजु,दीपा बंग,किर्ती झंवर,सोनल जाजु,सुनिता बंग,पुनम लाहोटी, सुजाता मुंदडा आदींनी परिश्रम घेतले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार