MB NEWS-अॅक्शन मोड: पंकजा मुंडे परळीत;सकाळपासुन अभ्यागतांची रिघ- जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण

 अॅक्शन मोड: पंकजा मुंडे परळीत;सकाळपासुन अभ्यागतांची रिघ- जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    मुंडे आणि गर्दी हे नेहमीचेच समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनपासून परळीत हे चित्र बघायला मिळते. यश: श्री बंगल्यावर आज पुन्हा एकदा तीच गर्दी,तोच माहोल आणि तीच लगबग बघायला मिळत होती. भेटायला आलेल्या लोकांची गर्दी बघता बघता एवढी झाली की पंकजा मुंडे यांना एकप्रकारे जनता दरबार घ्यावा लागला.या जनता दरबारात प्रत्येकाशी संवाद साधत व समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने पंकजा मुंडे यांनी तात्काळ कार्यवाही केली. 

           कोरोनाकाळ, लाॅकडाऊन या सर्व परिस्थितीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून व अप्रत्यक्ष लोकांचे सेवाकार्य सुरुच होते परंतु गेल्या दोन दिवसांपासून भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे परळीत दाखल झाल्यामुळे नागरीकांना प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडण्यासाठी त्या उपलब्ध झाल्या आहेत. सध्या पंकजा मुंडे अॅक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे.बर्याच दिवसांपासून प्रलंबित स्थानिक विषय,संघटनात्मक विषय, राजकीय घडामोडींवर निर्णय, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संदर्भातील विषय, विविध संस्थात्मक विषय, नागरिकांचे प्रश्न आदी सर्व पातळ्यांवर हालचालींना वेग आलेला दिसुन येत आहे.

पंकजा मुंडे परळीत आल्यापासून थेट अॅक्शन मोड मध्ये उतरल्या आहेत. पुरग्रस्त मदतफेरीत पुर्णवेळ देत शहरातील इतर कार्यक्रम व उपक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली. तसेच विविध विषयांच्या संदर्भाने बैठकांच्या फेर्या, जनतेच्या भेटीगाठी असा संपुर्ण दिनक्रम दिसुन येत आहे.आज सकाळपासुन अभ्यागतांची 'यश:श्री'वर  रिघ लागली होती. पंकजा मुंडे यांनी आलेल्या प्रत्येकाला भेटीसाठी वेळ दिला तसेच जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र यश:श्री' निवासस्थानी बघायला मिळाले.


दरम्यान,परळी येथील आजच्या जनता दरबाराचे काही छायाचित्रे पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर शेअर केले असून 'परळी येथे नेहमीप्रमाणे जनता दरबार..... नागरिकांच्या समस्यांचे निराकरण' अशा फोटो ओळी शेअर केल्या आहेत.

🕳️ मिलिंदनगर येथे विवाह समारंभास उपस्थिती..


    दिवसभरात पंकजा मुंडे यांनी विविध बैठका, भेटीगाठी व कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मिलिंदनगर येथे झालेल्या विवाह समारंभास उपस्थित राहून त्यांनी वधुवरांना शुभेच्छा दिल्या.पंकजा मुंडे यांच्या बरोबर फोटो, सेल्फी काढण्यासाठी तरुणाई ,महिला यांनी गर्दी केली होती.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार