MB NEWS-परळी मतदारसंघातील दळवळणासह इतरही विकासाची कामे जलदगतीने पूर्ण करू - ना. धनंजय मुंडे*

 *परळी मतदारसंघातील दळवळणासह इतरही विकासाची कामे जलदगतीने पूर्ण करू - ना. धनंजय मुंडे*



*ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते परळी बायपास व परळी ते धर्मापुरी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न, दर्जेदार पद्धतीने वेळेत काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना*




*आम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागणारे लोक - ना. मुंडेंनी पुन्हा करून दिली आठवण!*


परळी (दि. 03) ---- : परळी शहर बायपास, परळी ते धर्मापुरी रस्ता या दोन कामांना आज सुरुवात झाली, परळी अंबाजोगाई रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल, परळी ते तेलगाव रस्त्याचीही निविदा प्रक्रिया पूर्ण होत आहे; मतदारसंघात दळणवळणाच्या सोयीसह इतरही विकासकामे जलदगतीने पूर्ण करू असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.




अनेक वर्षांपासून रखडलेल्या परळी शहर बायपास या रस्त्याच्या 4 पदरी डांबरीकरणाचे व परळी ते धर्मापुरी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले, या कार्यक्रमात ते बोलत होते. 


*विरोधकांना सल्ला...* 


परळी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून, खोदलेले व पडलेले सर्व खड्डे बुजवून परळी शहर येत्या तीन महिन्यांच्या आत खड्डे व धुळमुक्त करू; असे आश्वासन ना. धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिले आहे. नगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी विकासकामांत राजकारण करू नये, उलट आपल्या हाती असलेल्या केंद्रीय सत्तेचा आणखी विकासकामे परळीत आणण्यासाठी वापर करावा, असा खोचक सल्लाही ना. मुंडे यांनी नाव न घेता विरोधकांना दिला आहे. 



विधानसभा निवडणुकीत परळीच्या जनतेला येत्या पाच वर्षात त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल इतका विकास करून दाखवू, या ना. मुंडे यांनी दिलेल्या अभिवचनाची आठवण काढत 'आम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागणारे लोक आहोत', अशी आठवणही ना. मुंडेंनी उपस्थितांना करून दिली. 


या दोनही औपचारिक भूमिपूजन समारंभास आ. संजय दौंड, जि.प. अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हलगे, जि.प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दीपकनाना देशमुख, शिवाजी सिरसाट, पं. स.सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, सौ. संगीताताई तुपसागर, प्रा. मधुकर आघाव, सुरेश अण्णा टाक, भाऊसाहेब कराड, चेतन सौंदळे, रवींद्र परदेशी, समद भाई, वैजनाथ सोळंके, दत्ता आबा पाटील, संजय आघाव, माणिकराव फड, गोविंद बबनराव फड, कांताभाऊ फड, तुळशीराम पवार रणजित लोमटे, विलास बिडगर, माऊली मुंडे, गोविंद मुंडे, बंडू गित्ते, सौ. प्रियांका ताई रोडे, शंकर कापसे, सौ. अर्चनाताई दौंड, यश कन्स्ट्रक्शनचे प्रदीप ठोंबरे यांसह मान्यवर उपस्थित होते. 


*दीड वर्षात 'या' शब्दांच्या पूर्तीकडे वाटचाल...*


विधानसभा निवडणुकीच्या नंतर परळी मतदारसंघात ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी शहराच्या बायपास रस्त्याच्या कामास भरीव निधी उपलब्ध झाला असून, मागील सरकारच्या काळात अनेकवेळा केवळ भूमिपूजन झालेल्या बायपासच्या कामाला आता मात्र प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. 


परळी शहर बायपास सह, परळी ते धर्मापुरी या रस्त्याच्या कामाचेही भूमीपुजन झाले असून हे काम देखील 8 महिन्यांच्या आतच व तेही अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे अशा सूचना ना. धनंजय मुंडे यांनी संबंधित कंत्राटदारांना चालू भाषणाच्या दरम्यानच दिल्या आहेत!


परळी ते तेलगाव या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरनाच्या कामाचीही निविदा प्रक्रिया पूर्ण होत असून या कामसही लवकरच गती मिळणार असल्याचे ना. मुंडे पुढे बोलताना म्हणाले. 


याशिवाय नगर परिषदेच्या माध्यमातून भुयारी गटार योजना तसेच अन्य विकास कामे शहरात सुरू असून काही प्रमाणात नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, मात्र येत्या तीन महिन्यात खड्डे बुजवून त्यावरील रस्ते होते त्यापेक्षा चांगल्या दर्जाचे तयार करून संपूर्ण परळी शहर खड्डे व धुळमुक्त करू, असे नियोजन केले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


*एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आणणार...*


अनेक वर्षांपासून पाहिलेले पंचतारांकित एमआयडीसीचे काम आम्ही सत्तेत येतात पूर्णत्वाकडे घेऊन जात आहोत, नोटिफिकेशन निघाले, 35 हेक्टर जागेची प्रत्यक्ष मोजणी पूर्ण झाली, आता या जागेत नवनवीन गुंतवणूकदार आणून इथे उद्योगांना चालना देऊ, या भागात नवीन रोजगार निर्मिती करू; यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही ना. मुंडे पुढे बोलताना म्हणाले. 


*थर्मल पवार प्लांट मधील संच बंद केले तर सोलारचे प्लांट सुरू करू...*


थर्मल पवार प्लांट मधील काही संच कोळसा व अन्य अडचणींमुळे बंद करण्यात आले आहेत, मात्र आपण ऊर्जा विभागाशी याबाबत चर्चा केली असून, तितक्याच क्षमतेचे सोलार प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही ना. मुंडे म्हणाले. 


*तर परळीही नांदेड-लातूर प्रमाणे विकसित दिसेल..*


मलकापूर ते वाका या भागातील 11 साठवण तलावांच्या पाणी उपलब्धीचा मार्ग मोकळा झाला असून या 11 साठवण तलावांच्या माध्यमातून या भागातील आणखी 35% क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या भागातला कोरडवाहू शेती करणारा शेतकरी बागायतदार व सधन व्हावा यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे ना. मुंडे म्हणाले. 


परळी मतदारसंघातील रखडलेल्या प्रत्येक विकासकामांना येत्या काळात गती देऊन दिलेला पूर्ण शब्द करू, परळी शहर व तालुका समृद्ध करून इथल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीचे उत्त्पन्न वाढविणे हे आपले उद्दिष्ट आहे व त्यापासून मी कधीही स्वतःला वेगळे करू शकत नाही, असे म्हणतच परळीचा लातूर व नांदेड शहरांच्या धर्तीवर विकास करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ना. धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद केंद्रे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत यश कन्स्ट्रक्शनचे प्रदीप ठोंबरे यांनी केले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !