MB NEWS-*परळी मतदारसंघात विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही - ना. धनंजय मुंडे* *अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी रस्त्याच्या कामाचे ना. मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न*

 *परळी मतदारसंघात विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही - ना. धनंजय मुंडे*



*अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी रस्त्याच्या कामाचे ना. मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न*


अंबाजोगाई (दि. 3) ---- : परळी मतदारसंघात व्यापक स्वरूपात विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. या कामांना कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. 


अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे प्रमुख जिल्हा मार्ग ते बागझरी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन (शनिवारी) ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 6 किलोमीटर डांबरीकरण व मजबुतीकरण, तसेच 750 मीटर काँक्रीटीकरण असे या रस्त्याचे एकूण 350 लक्ष रुपयांचे एकूण काम 1 वर्षाच्या आत पूर्ण केले जावे, अशी अपेक्षाही ना. मुंडेंनी संबंधीतांकडून व्यक्त केली. 


या कार्यक्रमास ना. मुंडे यांच्यासह जि.प. अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट, आ. संजय दौंड, गोविंदराव देशमुख, राजेश्वर चव्हाण, ऍड. गोविंदराव फड, ताराचंद शिंदे, दत्ता आबा पाटील, बालासाहेब गंगणे, सुधाकर माले, गणेश देशमुख, धर्मराज पाटील, अरुण जगताप, चंद्रकांत चाटे, विश्वंभार फड, सत्यजित सिरसाट, बालासाहेब कातकडे, गुणवंत आगळे, प्रकाश चाटे, बबन मुंडे, व्यंकट सोनवणे, बबन सोनवणे, महादेव वाकडे, बालासाहेब लव्हारे, बालाजी डोंगरे, रामलिंग चव्हाण, राजाभाऊ मुरकुटे, लक्ष्मण भताने, सोपान फड, विठ्ठल कोकरे, दत्ता गंगणे, कैलास गायकवाड, अशोक चाटे, लिंबराज लहाने, धनंजय सोळंके, बालाजी फड यांसह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद महाराज केंद्रे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !