MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी केले बदने कुटुंबियांचे केले सांत्वन

 पंकजाताई मुंडे यांनी केले बदने कुटुंबियांचे केले सांत्वन 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  

माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज दि.30 जुलै रोजी मालेवाडीचे भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. वैजनाथ बदने यांच्या कुटुंबीयांची निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच स्व. वैजनाथ बदने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष मुंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

          मालेवाडी येथील सरपंच भुराज बदने यांचे वडील वैजनाथ बदने यांचे अल्पशा आजाराने गुरुवार, दि.22 जुलै रोजी 83 व्या वर्षी निधन झाले. बदने कुटुंबियांची भेट देऊन माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांत्वनपर भेट देऊन कुटुंबाला आधार दिला. तालुक्यातील  मालेवाडीसह परिसरात सर्व परिचित व्यक्तीमत्व होते. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यासोबत निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे हे आत्मिक नाते या कुटुंबाशी आहे. वैजनाथ बदने यांच्या निधनाने ग्रामीण भागातील व्यक्तीमत्व हरपले अशा शब्दात पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. बदने कुटुंबियांचे विविध क्षेत्रातील मान्यवरानी केले सांत्वन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार