MB NEWS-जन्मदिन मनोगत: उतणार नाही,मातणार नाही , घेतलेला जनसेवेचा वसा सोडणार नाही - ना.धनंजय मुंडे 🌑 आशिर्वाद कायम ठेवा;यापुढची प्रत्येक निवडक जिंकणारच धनंजय मुंडेंनी व्यक्त केला दृढ संकल्प

 जन्मदिन मनोगत: उतणार नाही,मातणार नाही , घेतलेला जनसेवेचा वसा सोडणार नाही - ना.धनंजय मुंडे



🌑 आशिर्वाद कायम ठेवा;यापुढची प्रत्येक निवडक जिंकणारच धनंजय मुंडेंनी व्यक्त केला दृढ संकल्प


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
         जीवनात अनेक चढ-उतार पाहिले.निवडणुका हरलो-जिंकलो. पण प्रत्येक वेळी प्रामाणिकपणे काम करत राहिलो.कधीही दिखाऊपणा केला नाही.एक एक सहकारी जोडत गेलो.एकवेळ होती मी तर सोडाच पण माझ्या आसपास फिरकणार्या, माझ्यासमवेत फिरणार्या प्रत्येकाला त्रास सहन करावा लागला. आज लोकं मला नेता म्हणू लागले व माझ्यासोबतचे सहकारीही नेते होऊन विविध पदांवर यशस्वी काम करीत आहेत.हे सोपं काम नाही तर ऐतिहासिक काम आहे याचा मला निश्चितच अभिमान आहे.असाचआशिर्वाद कायम ठेवा.उतणार नाही,मातणार नाही , घेतलेला जनसेवेचा वसा सोडणार नाही असे जन्मदिन मनोगत व्यक्त करतानाच यापुढची प्रत्येक निवडक जिंकणारच असा आत्मविश्वासपुर्वक दृढ संकल्प ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.


          परळी येथे ना. धनंजय मुंडे यांचा कौटुंबिक वातावरणात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ना. मुंडेंच्या आई रुक्मिणीबाई मुंडे, सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी औक्षण केले. त्यानंतर परळीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ना. मुंडेंचा हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आ. संजय दौंड, ना. मुंडेंच्या आई रुक्मिणीबाई मुंडे, सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे, काकी कमलबाई मुंडे, बंधू श्री. अजय मुंडे, रामेश्वर मुंडे, अभय मुंडे, भगिनी सौ. उर्मिलाताई केंद्रे, सौ. मनीषाताई अजय मुंडे यांसह मुंडे कुटुंबीय उपस्थित होते.यावेळी धनंजय मुंडे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. पूर्वीच्या संघर्षाच्या काळात, ज्या सहकारी- कार्यकर्त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही, माझी साथ देण्यामुळे त्यांना अडचणीत आणण्यात आले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे माझ्या हृदयात स्थान आहे. कोविड विषयक निर्बंध असल्यामुळे जरी सतत भेटीगाठी होत नसल्या तरी माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या एकही सहकाऱ्याचा विसर पडू देणार नाही असा विश्वास ना. मुंडेंनी आपल्या सहकाऱ्यांना दिला. 


              यावेळी विविध लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, पत्रकार यांसह अनेक कार्यकर्त्यांनी ना. मुंडेंना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद महाराज केंद्रे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार