प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-मुस्लीमधर्मीय मेहतर भंगी सफाई कामगारांच्या सेवा संरक्षित करण्याबाबत लवकरच निर्णय:- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे*

 *मुस्लीमधर्मीय मेहतर भंगी सफाई कामगारांच्या सेवा संरक्षित करण्याबाबत लवकरच निर्णय:- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे*

 


   मुंबई, दि.१३: राज्यातील मुस्लीमधर्मीय मेहतर भंगी समाजातील सफाई कामगारांना वारसा हक्काने शासन सेवेत नियुक्ती देताना अनेक अडचणी आहेत. मुस्लीमधर्मीय मेहतर भंगी समाजातील सफाई कामगारांच्या सेवा संरक्षित करण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आगामी मंत्रीमंडळ बैठकीत विषय सादर करू तसेच या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


            मंत्रालयातील दालनात राज्यातील मुस्लीमधर्मिय मेहतर भंगी समाजातील सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते.यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे, माजी आमदार आसीफ शेख,मेहतर समाज विकास महासमितीचे अध्यक्ष शकील बेग,शहनवाज गफार शेख यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.



            मंत्री श्री.मुंडे म्हणाले,सफाई कामगारांच्या वारसा हक्क प्रकरणात नियुक्ती देताना विविध प्रशासकीय विभाग व आस्थापनांना अडचणी आहेत.विविध संघटनांच्या मागण्या व लाड समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत यापूर्वी काढलेल्या शासन निर्णयांचे एकत्रीकरण करून सर्वसमावेशक बांबीसंदर्भात तातडीने सुधारित निर्णय घेण्याच्या सुचनाही या बैठकीत करण्यात आल्या.


            यावेळी मेहतर समाज विकास महासमितीचे अध्यक्ष शकील बेग यांनी या समाजातील सफाई कामगारांच्या वारसा हक्काने मिळणा-या नियुक्तीतील अडचणी व इतर समस्यांचे निवेदन बैठकीत सादर केले.


 *केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रस्ताव त्रुटी दूर करून तात्काळ सादर करावेत* 


  केंद्र पुरस्कृत दिनदयाळ दिव्यांग पुनवर्सन योजना(DDRS),दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी सेवासुविधा पुरविणे(SIPDA) या तिन्ही योजनांचे २०१८ -१९,२०१९-२० व २०२०-२१ या आर्थिक वर्षातील संपूर्ण कार्यवाही विहीत वेळेत करावी. तसेच कोविड-१९ मुळे प्रलंबित असलेली प्रस्तावांबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना सामाजिक न्याय मंत्री यांनी दिल्या.


मंत्रालयातील दालनात केंद्र पुरस्कृत योजनांबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे,दिव्यांग कल्याण विभागाचे सहसचिव अ.प्रा.अहिरे , विजय कान्हेकर यावेळी उपस्थित होते.


  *अनुदानीत वसतीगृहांच्या कर्मचा-यांच्या प्रश्नाबाबत सामाजिक न्याय विभाग निर्णय घेईल* 


 अनुदानीत वसतीगृहातील कर्मचारी सामाजिक न्याय विभागाचेच कर्मचारी आहेत त्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढू व सामाजिक न्याय विभागामार्फत त्यांच्या वेतनासंदर्भाबाबत उच्चस्तरीय समितीकडेही आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचा-यांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत मंत्रालयातील दालनात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.यावेळी अनुदानित वसतीगृहाचे कर्मचारी यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.


  *वैदू समाजाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी सामाजिक न्याय विभागाने कार्यवाही करावी* 


    वैदू समाज हा एकाच ठिकाणी स्थायिक नसल्यामुळे लोकांकडे १९६१ पूर्वीचे पुरावे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे त्यांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्रे मिळत नाहीत त्यामुळे अशा समस्या ज्या ठिकाणी आहेत तिथे सामाजिक न्याय विभागाने वैयक्तीक रित्या संबधित अधिका-यांना पाठवून या समस्यांचे निराकरण करावे तसेच भविष्यात जात दाखले देताना सामाजिक न्याय विभाग अनेक सुधारणा करणार असल्याचेही यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत सांगितले.मंत्रालयातील दालनात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली . 


या बैठकीला वैदू समाज नवचेतना संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद शिंदे,खजिनदार विनोद पवार,बाबासाहेब लोखंडे उपस्थित होते.

                                                                   *****

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या