MB NEWS-गाव कोरोनामुक्त करुन निरामय जीवनक्रम निर्माण करा- पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने* ⬛ *_टोकवाडी येथे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले गावकऱ्यांना मार्गदर्शन_*

 *गाव कोरोनामुक्त करुन निरामय जीवनक्रम निर्माण करा- पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने*



⬛ *_टोकवाडी येथे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले गावकऱ्यांना मार्गदर्शन_*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

      टोकवाडी येथील विविध कामांची व उपक्रमांची नेहमीच चांगली चर्चा होत असते.स्वच्छता,शिक्षण, आरोग्य,नागरी सुविधा आणि विकासकामात टोकवाडी ग्रामपंचायतीने मोठे काम उभे केले असुन ते कौतुकास्पद आहे.संपुर्ण गावकरी यासाठी हातात हात घालून काम करतात, लोकसहभागातून व एकजुटीतुनच लक्षवेधी काम टोकवाडीकरांनी उभे केले आहे.त्याचपद्धतीने नागरिकांनी आता आपलं गाव 'शुन्य कोरोनाचा' संकल्प करुन कोरोनामुक्त निरामय जीवनक्रम निर्माण करावा असे आवाहन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.



        राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सोमवारी (दि.५) टोकवाडी येथे सदीच्छा भेट दिली. टोकवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रम व कामांची त्यांनी माहिती घेतली. गावातील स्वच्छता, शुद्ध जलयोजना, वृक्षसंवर्धन व घनवृक्षलागवड, जि.प.शाळा, अंगणवाडी क्र.१,२,३, स्मशानभूमी, वाचनालय आदींसह विविध कामांचे त्यांनी कौतुक केले. टोकवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध स्तरांवर होत असलेली कामे व गावकऱ्यांच्या एकजुटीने निर्माण झालेले सुंदर, समृद्ध गाव पासुन त्यांनी कौतुक केले व समाधान व्यक्त केले. टोकवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला.




       यावेळी गावकऱ्यांना पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी कोरोनामुक्तीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. प्रत्येकाने कोरोनामुक्त गावाचा संकल्प करावा. काळजी,चाचणी व संपुर्ण लसीकरण करून येणाऱ्या काळात कोरोनाला जवळपासही फिरकु द्यायचं नाही याचा प्रत्येकाने निर्धार करावा. कोरोनाविषयक घ्यायची काळजी व कोरोनाला दुर ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे याची आता सर्वांनाच माहिती झालेली आहे.त्यामुळे निश्चितच टोकवाडी गाव स्वच्छतेप्रमाणेच कोरोनामुक्त गाव चळवळीतही अग्रेसर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

           यावेळी सरपंच सौ.गोदावरीताई राजाराम मुंडे, उपसरपंच सुरेश रोडे, श्री.वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजाराम मुंडे,ग्रा.प.सदस्य तुकाराम काळे, लहुदास मुंडे, हभप संपत महाराज गित्ते, साहेबराव रोडे, सुनील मुंडे, हनुमंत मुंडे,व्हि.डी. मुंडे, रमेश मुंडे,बाळु मुंडे, भागवत मुंडे, नारायण मुंडे, ग्रा.पं.कर्मचारी, स्वच्छतागृही, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स, मदतनीस,ग्रामसंघ अध्यक्ष, बचतगटकर्मी, बचतगट वर्धिणी आदींसह नागरीक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार