MB NEWS-तीन महिन्यानंतर परळीत एकही खड्डा किंवा धूळ दिसणार नाही - धनंजय मुंडेंनी दिला शब्द

 तीन महिन्यानंतर परळीत एकही खड्डा किंवा धूळ दिसणार नाही - धनंजय मुंडेंनी दिला शब्द



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

           सध्या परळीत ड्रेनेज लाईनचे काम सुरू असून, त्यामुळे परळी शहरात खड्डे झाले आहेत. विरोधक मात्र या पडलेल्या खड्ड्याच्या मुद्यावरून गलिच्छ राजकारण करत आहेत. परंतु विकासकामे जमीनीवरच होत असतात हवेत तर करता येत नाहीत.त्यामुळे ही बाब समजुन घेतली पाहिजे.नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अश्या प्रकारचे राजकारण करणे हे त्यांना शोभणारे नाही. ज्या ज्या वेळेस निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांनी असे गलिच्छ राजकारण केले, त्या त्या वेळेस हे विरोधक तोंडावर पडले आहेत असा टोला धनंजय मुंडे यांनी भाजपाला लगावला आहे. येणाऱ्या 3 महिन्यात या परळी शहरात सर्व रस्त्याचे काम पूर्ण करणार असून शहरात एकही खड्डा किंवा कुठेच धूळ दिसणार नाही. असा शब्द देतो, असं आश्वासन धनंजय मुंडेंनी या प्रसंगी परळीकरांना दिलंय.

      


     परळी शहर बायपास व परळी-धर्मापुरी रस्त्याच्या च्या कामाला सुरुवात झाली असून आज शनिवारी (दि. 03) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते  भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. परळी मतदारसंघात विकासाची मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. दिलेला प्रत्येक शब्द मी पुर्ण करुन दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले.



🕳️ *विरोधकांना सल्ला...* 

परळी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून, खोदलेले व पडलेले सर्व खड्डे बुजवून परळी शहर येत्या तीन महिन्यांच्या आत खड्डे व धुळमुक्त करू; असे आश्वासन ना. धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिले आहे. नगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी विकासकामांत राजकारण करू नये, उलट आपल्या हाती असलेल्या केंद्रीय सत्तेचा आणखी विकासकामे परळीत आणण्यासाठी वापर करावा, असा खोचक सल्लाही ना. मुंडे यांनी नाव न घेता विरोधकांना दिला आहे. विधानसभा निवडणुकीत परळीच्या जनतेला येत्या पाच वर्षात त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल इतका विकास करून दाखवू, या ना. मुंडे यांनी दिलेल्या अभिवचनाची आठवण काढत 'आम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागणारे लोक आहोत', अशी आठवणही ना. मुंडेंनी उपस्थितांना करून दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार