MB NEWS-श्रीमती सुनिता कोम्मावार-दिक्कतवार लिखित 'बापमाणसं' (कूळकथा) व 'अंतरंग' (कविता संग्रह) या दोन पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा

 श्रीमती सुनिता कोम्मावार-दिक्कतवार लिखित 'बापमाणसं' (कूळकथा) व 'अंतरंग' (कविता संग्रह) या दोन पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा



परळी वैजनाथ (प्रतिनिधी): येथील लेखिका व अभिजात कवयित्री श्रीमती सुनीता कोम्मावार-दिक्कतवार यांच्या 'बापमाणसं' (कूळकथा) व 'अंतरंग' (कविता संग्रह) या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ मार्फत आयोजित करण्यात आला आहे. परळी येथील स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,(काळाराम मंदिर), अंबेवेस या ठिकाणी रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी ११ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.चंदुलाल बियाणी (अध्यक्ष,म.सा.प., परळी वैजनाथ) असून श्रीमान प्रभाकर साळेगावकर (सुप्रसिद्ध लेखक, कवी, कलाकार व वक्ते माजलगाव) व माननीय सौ. अरुणा दिवेगावकर (सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री,लातूर) यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे.


 या कार्यक्रमास प्रमुख निमंत्रित म्हणून ह.भ.प. डॉक्टर श्री. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री (सुप्रसिद्ध कीर्तनकार, लेखक व वक्ते परळी वैजनाथ) उपस्थित राहणार असून, नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव मा.श्री. प्रदीपजी खाडे साहेब, माजी नगराध्यक्ष मा.श्री.बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, मा. श्री. विकासराव डुबे, अध्यक्ष आर्य वैश्य (कोमटी) समाज परळी वैजनाथ. आणि प्रज्ञा एज्युकेशन सोसायटी मुंबईचे प्रमुख श्री.अनंतरावजी जगतकर साहेब यांचीही उपस्थिती लाभणार आहे. श्रीमती सुनिता कोम्मावार- दिक्कतवार ह्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या 'नाथ शिक्षण संस्थे अंतर्गत मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात' माध्यमिक विभागात सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनाचा गणित हा विषय असूनही त्यांनी मराठी साहित्यामधील रस कधीच कमी होऊ दिला नाही व आपल्यातील या प्रतिभेला जिवंत ठेवत दर्जेदार लेखन सुरू ठेवले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास माननीय नामदार श्री.धनंजयजी मुंडे साहेबांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सदरील कार्यक्रमास शहरातील व तालुक्यातील सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद परळीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार