MB NEWS-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या शाखा उदघाटन व लसीकरण मोहीमेचे आयोजन शिवसेनेच्या वतीने गरजुना दोनशे छत्र्यांचे वाटप

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या शाखा उदघाटन व लसीकरण मोहीमेचे आयोजन 


शिवसेनेच्या वतीने गरजुना दोनशे छत्र्यांचे वाटप 



 
  परळी(प्रतिनिधी): शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शिवसेनेच्या वतीने १२ ते २४ जुलै दरम्यान शिवसंपर्क मोहिम संपूर्ण परळी तालुक्यात यशस्वी पणे राबवली गेली. 27 जुलै रोजी सिरसाळा व परळी शहरात शिवसेनेच्या शाखांचे उदघाटन व गरजूना दोनशे छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. बालाजी मंदिर पेठ गल्ली येथे कोव्हिशिल्ड आणि को-वॅक्सिन चे लसीकरण करून उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे शहर प्रमुख राजेश विभूते, यांनी केले आहे. 

आज दि 27 जुलै रोजी बालाजी मंदिर पेठ गल्ली येथे लसीकरनाला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार असून परिसरातील सर्व नागरिकांनी लस घ्यावी. सिरसाळा येथे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता शिवसेनेच्या शाखांचे उदघाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमाला परळी तालुक्यातील सर्व शिवसैनिकानी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, विधानसभा प्रमुख राजभैय्या पांडे, शहर प्रमुख राजेश विभूते, जिल्हा सहसंघटक रमेश चौंडे, तालुका सचिव रामराव माने, जेष्ठ नेते नारायण दादा सातपुते, शिवाजीराव शिंदे, भोजराज पालिवाल, हनुमान भारती युवासेना तालुका समन्वयक संतोष चौधरी, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, शहर युवा अधिकारी कृष्णा सुरवसे, शहर समन्वयक सुदर्शन यादव, युवासेना उपतालुका प्रमुख बाबा सोनवणे, कैलास कावरे, उमेश सोळंके, बळीराम काकडे, निखिल देशमुख, तुकाराम अप्पा नरवाडे, दीपक शिंदे, अजय आवाड, कैलास व्यवहारे, संतोष भोसले, गोरख सोळंके, विजय राठोड, राजेश पांचाळ, अश्रूबा काळे, आदि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार