MB NEWS-लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे ल लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी*

 *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे ल लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी*



परळी वैजनाथ ता.०१ (प्रतिनिधी)

          येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी रविवारी (ता.०१) साजरी करण्यात आली.

               शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख व प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे यांच्या हस्ते सुरुवातीला आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या जिवनकार्याचा आढावा घेताना सांगितले की, आण्णाभाऊ साठे यांनी ही  पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कामगारांच्या मनगटावर तरली असल्याचे सांगितले. कार्यक्रमास प्रा.डॉ जोशी, सिध्देश्वर कोकाट, श्री.दहिफळे, अनिल पत्की, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.फुटके यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार