MB NEWS-पावसाची उघडीप,खरिप पिके धोक्यात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी-राजेश गिते अन्यथा मा पंकजाताई मुंडे व खा डॉ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार

 पावसाची उघडीप,खरिप पिके धोक्यात



 प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी-राजेश गिते 



अन्यथा मा पंकजाताई मुंडे व खा डॉ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार 

परळी ( प्रतिनिधी) परळी वैजनाथ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.पाउस नसल्याने खरिपातील सोयाबीन,मुंग,बाजरी, कापूस, ज्वारी, आदि पिके करपून जात आहेत.आज परळी तालुक्यातील बेलंबा,कौठळी, मलकापूर आदि गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.

       .परिस्थिती फार बिकट आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पणामुळे हिरावून गेला आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भाजपा नेते राजेश गिते यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार परळी वैजनाथ यांच्या कडे केली आहे.

विविध गावचे सरपंच व शेतकरी यांना सोबत घेऊन तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे त्वरित करावेत, कृषी विभागाला व विमा कंपनी एजंट यांना पाहणी करण्यासाठी आदेश द्यावेत, शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी.प्रशासनाने लवकरात लवकर या निवेदनावर कारवाई करावी .

        अन्यथा आमच्या नेत्या भाजपा राष्ट्रीय सचिव मा पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा नेते राजेश गिते यांनी दिला आहे.

या निवेदनावर नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, मिरवट सरपंच धुराजी साबळे,मिरवट चेअरमन भरतराव इंगळे, मारोतराव आंधळे,दशरथ गिते, प्रदिप गिते, भास्कर गिते, बळीराम गिते,दत्तु गिते, बालाजी गुट्टे, अरविंद गुट्टे,शिवाजी डापकर,शिराम डापकर, आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !