MB NEWS-मुख्याध्यापक गुलाबराव जाधव सेवा निवृत्त*

 *मुख्याध्यापक गुलाबराव जाधव सेवा निवृत्त*



सिरसाळा, प्रतिनिधी....

सिरसाळा येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य गुलाबराव जाधव यांच्या सेवानिवृत्ती बद्दल संस्थेच्या वतीने ह्रदयसत्काराचे आयोजन  करण्यात आले.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक नरहरराव निर्मळ अण्णा व प्रमुख पाहुणेच्या उपस्तिथी मध्ये गुलाबराव जाधव यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.    

      स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास भागवतराव देशमुख, राकॉ चे तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव पौळ,  अश्रूबादादा काळे, संतोष पांडे, राजाभाऊ निर्मळ, बबनदाजी सोळंके, कुंडलिक लहाने  मिलिंद चोपडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

    गुलाबराव जाधव यांनी सेवकाळात सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकांचे ऋण व्यक्त केले. नरहरराव निर्मळ, लक्ष्मणराव पौळ, तसेच अनेक आजी माजी मुख्याध्यापकांनी सेवा निवृत्तीच्या अनुषंगाने जाधवांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.

     एस.एन.फपाळ, कौले सर, मोहन देशमुख, घोळवे, परळी हायस्कुलचे शेंडगे सर, भोसले,  प्रा.अनिल जाधव, धरपडे, तौर, शिक्षक वृंद तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड सर व आभार प्रदर्शन एस.बी.शिंगणे यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !